Marriage With Dog Viral News: बाबो! 2 मुलांचं कुत्र्यांसोबत लावलं लग्नं, विचित्र विवाहसोहळ्यात अख्खं गाव जेवलं

Odisha Dog & Human Wedding : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे एका मुलगा आणि मुलीचे चक्क कुत्र्यांशी लग्न लावण्यात आले.
Odisha Dog Human Wedding
Odisha Dog Human Wedding Saam Tv
Published On

Odisha Trending News : जगभरातील लग्नाबाबत अनेक प्रकारच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. काहींनी आपल्या बाहुलीशी लग्न केलं तर काहींनी स्वतःशी लग्न केलं. पण ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे एका मुलगा आणि मुलीचे चक्क कुत्र्यांशी लग्न लावण्यात आले. कुत्रा आणि मनुष्य यांच्यातील विवाह ऐकायला विचित्र वाटेल. पण हे सत्य आहे. (Latest Marathi News)

Odisha Dog Human Wedding
Buldhana Accident : लक्झरी बस अन् कारची समोरासमोर धडक; 1 जागीच ठार, 3 गंभीर जखमी

अंधश्रद्धेच्या आधारे दुष्ट आत्म्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी असे दोन विवाह झाल्याचं प्रकरण उजेडात आलं आहे. मचुआ सिंह यांनी आपल्या 11 वर्षाचा मुलाचे लग्न त्यांच्या घरातील पाळीव कुत्रीसोबत लग्न लावून दिलं. तर दुसरीकडे, मानस सिंह यांनी आपल्या मुलीचे लग्न (Marriage) एक पाळीव कुत्र्यासोबत लावून दिलं.

या कारणामुळे लावले जाते कुत्र्यासोबत लग्न ?

मुलांचा पहिला दात येताच मचुआ सिंग आणि मानस सिंग यांनी मुलांच्या लग्नासाठी कुत्र्याचा शोध सुरू करतात, असं न केल्यास आपल्या मुलांच्या आयुष्यावर वाईट परिणाम होऊ शकतो, असा या आदिवासी लोकांना वाटतं.

Odisha Dog Human Wedding
Video: पूर्वी करायचे राडा, आता बैठकीमुळे बदलले जीवन; झाले नगरसेवक, इतका बदल कसा झाला?

28 वर्षीय सागर सिंह यांनी सांगितलं की, समाजाच्या परंपरेनुसार हे दोन्ही विवाह रात्रभर सुरु होते. सकाळी सातवाजेपर्यंत सामूहिक जेवणाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुलाचं लग्न झाल्यानंतर वाईट आत्मा कुत्र्यांमध्ये शिरतो, अशी समाजाची धारणा आहे. याला कोणताही शास्त्रीय आधार नसला तरी ही अंधश्रद्धा पिढ्यानपिढ्या सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला होता, ज्यामध्ये एका कुटुंबाने दोन कुत्र्यांचे भव्य लग्न आयोजित केले होते. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला होता. 

लग्नात आश्‍चर्यकारक गोष्ट अशी होती की,  जशी एखाद्या लग्नाची सजावट करण्यात येते, त्याचपद्धतीने लग्नाची सजावट केली होती. विशेष म्हणजे मादी कुत्र्याला त्यावेळी निरोप देण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com