Odisha Crime: जिवलग मित्रांमध्ये 'इयरफोन्स'वरुन वाद; दगडाने ठेचून ९वीतील विद्यार्थ्याची हत्या

Odisha isa Rourkela Crime: याप्रकरणी दोन मुलांसह, गुन्ह्याचा साक्षीदार असलेल्या आणखी एका मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
Odisa Crime News
Odisa Crime NewsSaam tv

Odisha Crime News:

ओडीसा राज्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ओडिशाच्या राउरकेला येथे इयरफोन्स शेअर करण्यावरून झालेल्या भांडणानंतर इयत्ता 9 वीच्या विद्यार्थ्याची त्याच्या दोन मित्रांनी दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Odisa Crime News
Sai Baba Temple: साईबाबा संस्थानचा मोठा निर्णय! भक्तांनी दान केलेले रक्त गरजूंना मोफत मिळणार, देशभरात साई मंदिर उभारणीस पुढाकार

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ओडिसाच्या (Odisa) हेकाटे रोडलगत झुडपामध्ये एका 15 वर्षीय मुलाचा मृतदेह मंगळवारी सापडला होता. हा मुलगा रविवारपासून बेपत्ता होता. रविवारी संध्याकाळपासून विद्यार्थ्याचा ठावठिकाणा न लागल्याने त्याच्या पालकांनी आरएन पाली पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

त्यानंतर त्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. मुलाच्या पालकांकडून त्याच्या दोन मित्रांबद्दल माहिती मिळाली. या मित्रांची पोलिसांनी चौकशी केली असता या धक्कादायक प्रकरणाचा उलघडा झाला.

का केली हत्या...

समोर आलेल्या माहितीनुसार, तिघेही मित्र सायकलवरून जॉयराईडवर जात होते. यावेळी त्यांच्यात हॅकेट रोडवर मोबाईलचे इअरफोन्स शेअर करण्यावरून जोराचे भांडण झाले. या भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि दोघांनी मिळून या मुलाची दगडाने ठेचून हत्या केली. याप्रकरणी दोन मुलांसह, गुन्ह्याचा साक्षीदार असलेल्या आणखी एका मुलालाही ताब्यात घेण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

Odisa Crime News
Maharashtra Politics: शिंदे गटाचा मास्टर प्लान, ठाकरे गटाच्या ४ खासदारांना नोटीस धाडणार; कारण काय?

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com