सचिन बनसोडे, प्रतिनिधी
साईबाबांच्या शिकवणुकीचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी साई संस्थानने देशभर साई मंदिर उभारणीत पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद्या संस्थेने किंवा राज्य सरकारने पाच एकर जागा उपलब्ध करून दिल्यास तेथे साई संस्थान शिर्डी सारखेच मंदिर उभारणार आणि चालवणार आहे. याशिवाय तेथे रूग्णालय, अन्नदान आदी उपक्रम राबवले जाणार आहेत.
देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डीचे साईबाबा संस्थान देशव्यापी मंदिर असोसिएशनची स्थापना करणार असून देशभर साईमंदीर उभारणीसाठी साईसंस्थानने पुढाकार घेणार असल्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
यासह साईसंस्थानने नवीन दर्शनपासेस पॉलिसी, डोनेशन पॉलिसी आणि रक्तदान पॉलिसी आदींची घोषणा केल्या आहेत. मात्र या सर्व योजनांबाबत अंतिम निर्णय घेण्यापुर्वी भाविक आणि ग्रामस्थांकडून सुचना मागवण्यात आल्या आहेत.
साईमंदिर परिसरात भाविकांकडून रक्तदान केले जाते. यापुढे दानात मिळालेले रक्त रूग्णांना मोफत देण्यात येणार आहे. तसेच येथे काही बाहेरील रक्तपेढ्याही रक्तसंकलन करतात. त्यांनाही हे रक्त मोफतच द्यावे लागणार आहे. याबाबत संस्थानकडून संबधित रूग्णांशी संपर्क करून खातरजमा करण्यात येणार आहे. या रक्त पिशव्यांवर संस्थानचा टॅग असेल आणि नॉट फॉर सेल लिहीलेले असेल..
दर्शन पासेसमध्ये होणारा गैरवापर रोखणार..
तसेच आरती आणि दर्शन पासेस मध्ये होणारा गैरवापर रोखण्यासाठी साईंच्या आरतीचे सशुल्क पासेससाठी शिफारस करतांना यापुढे सर्व भाविकांचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर द्यावे लागणार आहेत.
पासेस कन्फरमेशनबाबत संबधित भाविकाच्या मोबाईलवर मेसेज पाठवला जाणार आहे. येत्या शुक्रवार पासुन प्रायोगिक तत्वावर याची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे.. टोकन नंबरसाठी बुकींग केल्यावर भाविकांना मेसेज पाठवला जाणार आहे.. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.