Nithari Case Result: निठारी हत्याकांड प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता; अलाहाबाद कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द

Nithari Case Result: नोएडाच्या बहुचर्चित निठारी प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. कोर्टाने आरोपी सुरेंद्र कोळी आणि मनिंदर सिंग पंढेर यांची शिक्षा रद्द केली आहे.
noida nithari case Updates allahabad high court-cancelled-surinder koli and moninder pandher death sentence
noida nithari case Updates allahabad high court-cancelled-surinder koli and moninder pandher death sentenceSaam TV
Published On: 

Nithari Case Result

नोएडाच्या बहुचर्चित निठारी प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. कोर्टाने आरोपी सुरेंद्र कोळी आणि मनिंदर सिंग पंढेर यांची शिक्षा रद्द केली आहे. इतकंच नाही, तर आरोपींची निर्दोष मुक्तता देखील केली आहे.

2022 मध्ये सीबीआय न्यायालयाने दोन्ही दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याविरोधात त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी घेताना कोर्टाने दोन्ही आरोपींची फाशीची शिक्षा रद्द केली असून त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.  (Latest Marathi News)

noida nithari case Updates allahabad high court-cancelled-surinder koli and moninder pandher death sentence
Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार; भरत गोगावलेंना मंत्रिपद मिळणार? सुनील तटकरे म्हणाले...

न्यायमूर्ती अश्विनी कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती एसएएच रिझवी यांच्या कोर्टाने हा निर्णय दिला. 2006 साली दिल्ली नजीकच्या नोएडामधील हत्याकांडाने सर्वांनाच हादरवून टाकलं होतं. निठारी हत्याकांड हे भारताच्या इतिहासातील सर्वात भयंकर सिरीअल किलींग खटल्यांपैकी एक मानले जाते.

निठारी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील D-5 या घराच्या मागील बाजूच्या नाल्यात बेपत्ता झालेल्या मुलांच्या मृतदेहांचे अवशेष सापडले होते. या घटनेनं मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं होतं. यावेळी 20 वर्षीय तरुणीचं अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला त्यानंतर तिची हत्या केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली होती.

हत्येनंतर आरोपींनी तरुणीचे मृतदेह पुरुन टाकला होता. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी खोदकाम केलं असता, त्याठिकाणी अनेक मृतदेह आणि लहान मुलं-तरुणींचे कुजलेले अवयव आढळून आले. अशा पद्धतीने 19 कवट्या सापडल्याचं बोललं जातं.

दरम्यान, पोलिसांनी आरोपींविरोधात अपहरण, बलात्कार, खून आणि पुरावे नष्ट करणे अशा अनेक आरोपांसह हा खटला चालला. सीबीआय कोर्टानने सुरिंदर कोलीला नरभक्षक म्हणूनही दोषी ठरवले होते. याप्रकरणात कोर्टाने दोघांना फाशीची शिक्षा सुनावली होती. पुढे सुप्रीम कोर्टाने शिक्षा कायम ठेवली होती.

दरम्यान, निठारी हत्याकांडातून उद्भवलेल्या काही प्रकरणांत मोनिंदर सिंग पंढेर दोषी ठरला होता. तर काही इतर लोकांना निर्दोष सोडण्यात आलं होतं. पंढेर यांनी दोन खटल्यांमध्ये ट्रायल कोर्टानं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. अलहाबाद कोर्टाने त्यांची फाशीची शिक्षा रद्द केली आहे.

noida nithari case Updates allahabad high court-cancelled-surinder koli and moninder pandher death sentence
Solapur News: चंद्रकांत पाटलानंतर आता तुमचा नंबर, लवकरच शाईफेक करू; भीम आर्मीचा शिंदे-फडणवीसांना इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.