सोलापूरचे नवनिर्वाचित पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर भीम आर्मीचे अध्यक्ष अजय महिंद्रकर यांनी रविवारी शाई फेकली. याप्रकरणी पोलिसांनी महिंद्रकर यांना ताब्यात घेतलं. त्यांच्यावर कलम 353 अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यावर भीम आर्मीने आक्रमक पवित्रा घेतला असून शिंदे-फडणवीस सरकारला इशारा दिला आहे. (Latest Marathi News)
अजय महिंद्रकर यांच्यावरील गुन्हा मागे घ्या, अन्यथा येत्या काळात खाजगीकरणाविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरही शाईफेक करण्यात येईल, असा इशारा भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी दिला आहे. त्यामुळे हा वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्यानंतर पोलिसांनी (Police) अजय महिंद्रकर यांना बेदम मारहाण केली, चंद्रकांत पाटील यांच्यापासून अजय महिंद्रकर जीवाला धोका आहे, असा आरोपही अशोक कांबळे यांनी केला आहे. इतकंच नाही, तर कंत्राटी भरतीचा निर्णय तातडीने मागे घ्या, अन्यथा चंद्रकांत पाटलानंतर तुमच्यावरही शाईफेक करु, असा इशारा त्यांनी शिंदे-फडणवीस यांना दिला आहे.
पालकमंत्रीपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील रविवारी पहिल्यांदाच सोलापूर जिल्ह्यात आले होते. यावेळी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी कंत्राटी भरतीच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणबाजी करत आंदोलन केलं. इतकंच नाही, तर त्यांनी चंद्रकांत पाटील यांना काळे झेंडे देखील दाखवले.
यावेळी भीम आर्मीचे अध्यक्ष अजय महिंद्रकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकली. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी तातडीने महिंद्रकर यांना ताब्यात घेतलं. रात्री उशिरा पोलिसांनी महिंद्रकर यांच्याविरोधात कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल केला.
दरम्यान, महिंद्रकर यांच्यावर गुन्हा दाखल होताच भीम आर्मीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अजय महिंद्रकर यांच्यावरील गुन्हा मागे घ्या, अन्यथा येत्या काळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर शाईफेक करण्यात येईल, असा इशारा भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.