Chiplun Bridge Collapse: चिपळूणमध्ये पुलाचा काही भाग कोसळला; नागरिकांची पळापळ, पाहा थरारक घटनेचा VIDEO

Mumbai Goa Highway Bridge Collapse: बहादुरशेख नाका येथील फ्लाय ओव्हरला आधीच तडे गेलेत.
Chiplun Bridge Collapse
Chiplun Bridge CollapseSaam TV
Published On

Chiplun News:

चिपळूणमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई - गोवा महामार्गावरील उड्डाणपुलाचा काही भाग कोसळलाय. बहादुरशेख नाका येथील फ्लायओव्हरला आधीच तडे गेलेत. त्यात आज सकाळी पुलाचा काही भाग कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (Latest Marathi News)

Chiplun Bridge Collapse
Viral Video: अर्रर्र! एस्केलेटर सुरू होताच दोन महिला धाडकन खाली आफटल्या; अपघाताचा VIDEO व्हायरल

गेल्या अनेक महिन्यांपासून या फ्लायओव्हरचं काम सुरु आहे. याआधी गर्डरमुळे महामार्गावर धोका निर्माण झाला होता. आता या पुलाचे बांधकाम सुरू असताना धोका निर्माण झालाय. काम सुरु असलेल्या पुलाच्या आतील सळ्या दिसू लागल्यात.

पुलाचा काही भाग कोसळतानाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पूल कोसळला तेव्हा स्फोट झाल्यासारखा मोठा आवाज झाला असं तेथील काही नागरिकांनी म्हटलंय. घटनेनंतर स्थानीक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Chiplun Bridge Collapse
Kalyan Crime: संतापजनक! कॅब चालकाकडून प्रवासी तरुणीचा विनयभंग, कल्याण पूर्वेतील घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com