SCO meet in Goa : शांघाय सहकार्य संघटनेच्या (Shanghai Cooperation Organisation) परराष्ट्र मंत्र्यांची आज, शुक्रवारी गोव्यात बैठक होत आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सर्व सहयोगी देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांचे स्वागत केले. आजच्या या बैठकीत जुलैमध्ये होणाऱ्या बैठकीतील अजेंडा निश्चित करण्यात येणार आहे. याशिवाय १५ करारांनाही अंतिम स्वरुप दिलं जाणार आहे. तसेच चार नवे भागीदारही यात सहभागी होणार आहेत. (Latest Marathi News)
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांच्याशी हस्तांदोलन न करता लांबूनच त्यांना नमस्कार केला. यावेळी त्यांनी बैठकीला संबोधित करताना दहशतवादाचा मुद्दा उचलून धरला. सीमेपलीकडील दहशतवाद पूर्णपणे संपुष्टात आला पाहिजे. त्यांना होणारा निधी पुरवठा रोखला पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी पाकिस्तानला थेट नाव न घेता फटकारले.
संपूर्ण जग जेव्हा कोरोनाशी लढत होता. प्रत्येक देशात कोरोनानं मृत्यू होत होते. त्यावेळीही दहशतवादी कारवाया सुरूच होत्या, असेही ते म्हणाले.
तीन वर्षांपूर्वी म्हणजेच २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर पहिल्यांदाच चीनचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर आले आहेत. या दोन्ही देशांतील तणाव कायम आहे. दुसरीकडे बैठकीच्या आदल्या दिवशी चीनचे परराष्ट्र मंत्री छिन कांग यांनी भारत आणि चीन या दोन्ही देशांनी नवीन मार्ग शोधायला हवा, ज्याने दोन्ही देशांचा फायदा होईल, असे विधान केले होते.
यावेळी जयशंकर यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या समोरच दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करत धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. दहशतवादाला होणारा निधीचा पुरवठा रोखायला हवा, असे त्यांनी सुनावले.
या बैठकीत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो हे जयशंकर यांच्या समोरच बसले होते. जयशंकर यांनी सर्व परराष्ट्र मंत्र्यांना अभिवादन केले. त्यानंतर दहशतवादाच्या मुद्यावर खडे बोल सुनावले. दहशतवादाशी लढा देणे याला आपले प्राधान्य आहे. सीमेवर दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही, असे जयशंकर म्हणाले.
दहशतवादाशी एकत्रित लढा देऊ, असे सर्व देशांना आवाहन करतानाच टेरर फंडिंगसंदर्भात सर्व देशांना सावध राहण्याचा सल्लाही जयशंकर यांनी या बैठकीत दिला. दहशतवादांना जे फंडिंग केले जाते, ते तातडीने रोखायला हवे, असेही ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.