Manipur Violence Update: मणिपूरमधील परिस्थिती चिघळली; हिंसाचारानंतर कर्फ्यू लागू, इंटरनेटपाठोपाठ आता रेल्वेसेवाही बंद

Manipur Latest News: मणिपूरमध्ये इंटरनेट सेवेनंतर (Internet Service) आता रेल्वे सेवादेखील (Railway Service) बंद करण्यात आली आहे.
Manipur Violence
Manipur ViolenceSaam Tv News

Manipur News: मणिपूरमधील परिस्थिती चिघळत (Manipur Violence) चालली आहे. मणिपूरच्या अनेक जिल्ह्यांमध्ये आदिवासी जमातील नागरिकांनी रॅली काढल्या. त्यानंतर मणिपूरमध्ये अनेक ठिकाणी हिंसाचार झाला. मेईतेई समुदाय आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने परिस्थिती चिघळत चालली आहे. मणिपूरमध्ये इंटरनेट सेवेनंतर (Internet Service) आता रेल्वे सेवादेखील (Railway Service) बंद करण्यात आली आहे. त्याचसोबत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

Manipur Violence
Manipur Violence News: मणिपूरमधील हिंसाचार भडकला; परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी निमलष्करी दलाला दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

लष्कराकडून नागरिकांना आवाहन -

मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर सुरक्षच्या कारणास्तव भारतीय लष्कराकडून महत्वाची पाऊलं उचलली जात आहेत. या हिंसाचारानंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल केले जात आहे. त्यामुळे भारतीय लष्कराने नागरिकांना आवाहन केले आहे की, नागरिकांनी फक्त अधिकृत आणि सत्यापित स्त्रोतांद्वारे मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेवा.

इंटरनेट सेवा बंद -

मणिपूरमध्ये सतत वाढत चाललेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मोबाईल डेटानंतर ब्रॉडबँड सेवाही बंद करण्यात आली आहे. हिंसाचार आणि अफवा पसरवल्याबद्दल सरकारने रिलायन्स जिओ फायबर, एअरटेल एक्स्ट्रीम, बीएसएनएल इत्यादींच्या ब्रॉडबँड आणि डेटासेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

Manipur Violence
Youtuber Agastya Chauhan Death: व्हिडिओने केला घात! 300 किमीच्या वेगाने बाइक चालवणाऱ्या युट्यूबर अगस्त्य चौहानचा दुर्दैवी मृत्यू

रेल्वे सेवा बंद -

मणिपूरमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर ईशान्य सीमा रेल्वेने मणिपूरकडे जाणाऱ्या सर्व गाड्या थांबवल्या आहेत. एनएफ रेल्वेचे सीपीआरओ सब्यसाची डे यांनी एएनआयला सांगितले की, परिस्थिती सुधारेपर्यंत कोणतीही ट्रेन मणिपूरमध्ये प्रवेश करणार नाही. मणिपूर सरकारने रेल्वे वाहतूक थांबवण्याचा सल्ला दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

परिस्थिती नियंत्रणाबाहेर -

मणिपूरमधील परिस्थिती दिवसेदिवस चिघळत आहे. हिंसाचारानंतर परिस्थिती सामान्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. इम्फाळ आणि सिसपूरमध्ये परिस्थिती हाताबाहेर गेली असून तिथे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी जाळपोळ केली जात आहे.

Manipur Violence
Badrinath Landslide: वाहनांच्या रांगा, नागरिकांची गर्दी... अन् अचानक डोंगराचा मोठा भाग कोसळला, एकाचा मृत्यू

घरे, दुकाने जाळली-

मणिपूरमध्ये हिंसक जमावाने अनेक घरे, दुकाने आणि धार्मिक स्थळे जाळली आहेत. इंफाळमध्ये एका भाजपच्या आमदारावरही जमावाने हल्ला केला. आतापर्यंत 9000 लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. सुरक्षा छावण्यांमध्ये नागरिकांना पाठवण्यात आले आहे.

नागरिकांना सुरळित ठिकाणी हलवले -

मणिपूरमधील हिंसाचाराबद्दल लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, आतापर्यंत हिंसाचारग्रस्त चुरदाचंदपूरमधील सुमारे 5,000 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. तर 2,000 लोकांना इम्फाळ खोऱ्यात आणि आणखी 2,000 लोकांना तेंगनौपाल जिल्ह्यातील मोरेह या सीमावर्ती शहरात हलवण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com