Stampede : ख्रिसमसच्या आनंदावर विरजण, चेंगराचेंगरीत ३२ जणांचा मृत्यू

Nigeria stampede : नायजेरियामध्ये नाताळ सणाच्या आनंदावर विरजण पडलेय. ख्रिसमसच्या उत्सवावेळी खाद्यपदार्थ वाटप सुरू असताना दोन कार्यक्रमांमध्ये अचानक चेंगराचेंगरी झाली. या घटने आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू झालाय.
Nigeria stampede.jpg
Nigeria stampede.jpg@afrimarknews
Published On

Nigeria stampede News Update : नायजेरियामध्ये ख्रिसमस सेलिब्रेशनावेळी मोठी दुर्घटना घडली आहे. खाद्यपदार्थाचे वाटप सुरू असतानाच अचानक चेंगराचेंगरी झाली. या दुर्देवी घटनेत ३२ जणांचा मृत्यू झालाय. या घटनेत अनेकजण जखमी झाले आहेत, त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहत. मृतामध्ये चार चिमुकल्यांचाही समावेश आहे. २२ डिसेंबर रोजी नायजेरिया पोलिसांनी याबाबतची माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ख्रिसमस सेलिब्रेशनावेळी खाद्यपदार्थ घेण्यासाठी अचानक मोठा जमाव जमला होता. त्याचवेळी अचानक चेंगराचेंगरी झाली. लोकांची गर्दी मर्यादेबाहेर होती. चेंगराचेंगरी झाली त्यावेळी लोकांनी एकमेकांना पाहिलेही नाही. जमिनीवर पडलेल्या लोकांना तुडवत काही लोक पळत सुटले. त्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले. नायजेरियातील या दुर्घटनेमुळे सर्वत्र हाहाकार माजला. नायजेरियातील आनंदाचे वातावरण काही क्षणातच दु:खात बदलले. या घटनेत ३२ जणांचा मृत्यू झाला. अनेकजण जखमी आहेत. किरकोळ जखमी असणाऱ्या काही नागरिकांना उपचारानंतर सोडण्यात आले. काही रूग्णावर अद्याप उपचार सुरू आहेत.

नायजेरियामध्ये चेंगराचेंगरीच्या दोन घटना घडल्या. एका घटनेत २२ जणांचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या घटनेत १० जणांचा जीव गेला.

Nigeria stampede.jpg
Christmas Vacation 2024 : ख्रिसमस करा मुलांसोबत प्लान, फिरा मुंबईतील 5 बेस्ट लोकेशन

ओकिजा शहरात २२ जणांचा मृत्यू

चेंगराचेंगरीची पहिली घटना दक्षिण-पूर्व अनांब्रा राज्यातील ओकिजा शहरात घडली. या ठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीत 22 जणांचा मृत्यू झाला, असे पोलीस अधिकारी तोचुकवू इकेंगा यांनी सांगितले. ख्रिसमस सेलिब्रेशनच्या निमित्ताने एका व्यक्तीने ओकिजामध्ये अन्न-धान्य वाटपाचे आयोजन केले होते. त्यासाठी शेकडो लोक जमले होते. त्यावेळी अचानक गर्दी नियंत्रणाबाहेर गेली अन् चेंगराचेंगरी झाली.

Nigeria stampede.jpg
Christmas 2024 : ख्रिसमस चॉकलेट घरीच बनतील अवघ्या १५ मिनिटांत, फॉलो करा सिंपल रेसिपी

अबुजामध्ये दहा जणांचा मृत्यू

नायजेरियाची राजधानी अबुजा येथे एका चर्चमध्ये अन्न-धान्य आणि कपडे वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठीही शेकडो लोक जमले होते, पण अचानकच चेंगराचेंगरी झाली. लोक धान्य घेण्यासाठी एकमेकांना धक्के देत होते. या चेंगराचेंगरीमध्ये १० जणांचा मृत्यू झालाय. दुर्घटनास्थळावरून 1,000 हून अधिक लोकांना तात्काळ बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ज्यामध्ये अनेक मृतदेह जमिनीवर पडलेले दिसत आहे. काही लोक मदतीसाठी ओरडत असल्याचेही दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com