महाराष्ट्रासह यूपी, दिल्ली, राजस्थानमध्ये NIA चे छापे; PFI शी संबंधित ठिकाणांची झाडाझडती

NIA Raids On PFI: उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि दिल्ली या राज्यांमधील PFI च्या ठिकाणांवर छापेमारी करण्यात आलीय.
NIA Raids On PFI
NIA Raids On PFISaam Tv
Published On

NIA Raids On PFI:

PFI या संघटनेवर राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून कारवाई केली जात आहे. या संघटनेच्या देशभरातील डझनभर ठिकाणांवर एनआयएकडून छापेमारी करण्यात येत आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि दिल्ली या राज्यांमधील काही ठिकाणांवर ही कारवाई करण्यात आलीय. (Latest News)

पीएफआयवर मागील वर्षी बंदी घालण्यात आली होती. दहशतवादविरोधी बेकायदेशीर कारवाया कायद्यानुसार (UAPA) त्यावर बंदी घालण्यात आली होती. ही छापेमारी गुन्हा क्रमांक ३१/ २०२२अन्वये करण्यात आलीय. हे प्रकरण पीएफआय, संघटनेचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या हिंसक आणि बेकायदेशीर कारवायांमध्ये सहभागी होण्याशी संबंधित आहेत. या प्रकरणाशी संबंधित सर्व आरोपी हिंसक आणि बेकायदेशीर कारवायांच्या उद्देशाने पाटण्याच्या फुलवारी शरीफ भागात जमले होते.

दिल्लीतील हौज काझी पोलीस स्टेशन क्षेत्रातील बल्ली मारन, राजस्थानमधील टोंक, तामिळनाडूमधील मदुराई, उत्तर प्रदेशातील बाराबंकी, लखनौ, बहराइच, सीतापूर आणि हरदोईसह अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. एनआयएने लखनऊमधील माडेगंजमधील बडी पकारिया भागात छापा टाकला. दुसरीकडे एनआयएने महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी छापेमारी केली.

महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये छापे टाकण्यात आले. एनआयएच्या पथकाने अब्दुल वाहिद शेख नावाच्या व्यक्तीच्या घरातही छापा टाकला. विक्रोळीतील त्याच्या घराशिवाय भिवंडी, मुंब्रा येथील ठिकाणांवर एनआयएने छापे टाकले.

दरम्यान अब्दुल वाहिद शेखची ७/११ बॉम्बस्फोट प्रकरणात वाहिद शेखची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. संशयास्पद मोहिमा आणि निधी उभारणीच्या कारवायांमध्ये पीएफआयचा सहभाग असल्याच्या संशय एनआयएला आहे. याआधारे यंत्रणेनेने ७ ते १० लोकांना ताब्यात घेतले आहे. यापूर्वी एनआयएने रविवारी तिरुवनंतपुरम विमानतळावरून पीएफआय संशयिताला ताब्यात घेतले होते.

NIA Raids On PFI
SFJ Chief Pannu: भारतावर 'हमास'सारख्या हल्ल्याची धमकी, PM नरेंद्र मोदींचा उल्लेख केल्यानं टेन्शन वाढलं

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com