Woman Died: सावळा रंग अन् अडखळत इंग्रजी, सासरच्यांकडून हिणवणी; सुनेनं उचललं टोकाचं पाऊल

Color shaming: सावळ्या रंगामुळे आणि इंग्रजी भाषेवरील कमी प्रभुत्वामुळे नवरा आणि सासरच्या मंडळींकडून तिचा छळ सुरू होता. याच गोष्टीला कंटाळून तिने राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवले.
kerala crime news
kerala crime newsSaam TV
Published On

केरळमधील मलप्पूरमध्ये एका १९ वर्षीय नवविवाहित महिलेनं आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सावळ्या रंगामुळे आणि इंग्रजी भाषा अडखळत बोलत असल्यामुळे, सासरच्या मंडळींनी तिची हिणवणी केली होती. यामुळे ती खूप नाराज असायची, तसेच डिप्रेशनमध्येही गेली होती. याच गोष्टीला कंटाळून तिने राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

यासंदर्भात कोंडोट्टी पोलीस ठाण्यातील अधिकारी सांगतात, पीडित महिलेचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. तसेच तिचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं. बुधवारी सकाळी कुटुंबियांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पती आणि सासरच्या मंडळींकडून सातत्याने होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून, तिने आत्महत्या केल्याचा आरोप मृत तरूणीच्या कुटुंबियांनी केलाय.

kerala crime news
Baldness Virus: टक्कल व्हायरसमुळे मुलांचे लग्न जुळेना! बुलढाण्यातील गावकरांच्या अडचणीत वाढ

मयत मुलीच्या कुटुंबियांनी सांगितले की, कॉलेजमध्ये मुलगी उदास असायची. तिच्या घरच्यांनी तिला विचारले असता, सावळा रंग आणि इंग्रजी भाषेत कमी असलेल्या प्रभुत्वामुळे तिला नवरा आणि सासरच्या मंडळींकडून त्रास व्हायचा. अनेक दिवस ती नीट खात- पीत देखील नव्हती. हा प्रकार समजल्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी तिचे सांत्वन केले.

kerala crime news
Crime News: अनैतिक संबंधात पतीचा अडथळा, प्रियकराच्या मदतीने पत्नीने काटा काढला, दारू पाजली अन् मग...

समुपदेशनासाठी कुटुंबियांनी पीडित मुलीला डॉक्टरांकडे नेले. तिची मानसिक प्रकृती स्थिर झाली होती. त्यानंतर तिच्या माहेरच्या लोकांनी तिला पुन्हा सासरी धाडलं. मात्र, सासरकडच्या लोकांनी तिला पुन्हा मानसिक छळ करण्यास सुरूवात केली. याच त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या करायचे ठरवले आणि राहत्या घरात तिने गळफास घेत आयुष्य संपवलं. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com