साहित्य संमेलनात मोदी-पवारांची केमिस्ट्री, PM मोदींनी शरद पवारांना बसायला खुर्ची अन् स्वत: दिलं पाणी

Marathi Sahitya Sammelan 2025 : मराठी मानसाने अटकेपार झेंडा फडकवला आहे. मराठी संमेलन देशाच्या राजधानीत दुसऱ्यांना होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले याचा आनंद आहे.
Marathi Literature Conference 2025
Marathi Literature Conference 2025SaamTV
Published On

नवी दिल्ली : आज नवी दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा रंगला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील उपस्थिती होती. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे.

दरम्यान, या संमलेनाची सुरुवात झाली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात एक चांगली केमेस्ट्री पाहायला मिळाली. कार्यक्रम सुरु झाला तेव्हा मोदींनी पवारांना बसायला खुर्ची दिली. त्यानंतर स्वत: ग्लासमध्ये पाणी प्यायला दिलं, त्यानंतर त्यांच्या मनमोकळ्या गप्पा रंगताना दिसल्या. त्यानंतर

Marathi Literature Conference 2025
Pune News : पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, १५ दिवसात दुसऱ्यांदा जेवणात किडे; फोटो व्हायरल

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

मराठी मानसाने अटकेपार झेंडा फडकवला आहे. मराठी संमेलन देशाच्या राजधानीत दुसऱ्यांना होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले याचा आनंद आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी मोदींनी जी भुमिका घेतली ती महत्वाची आहे. मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले होते. त्यानंतर आता दिल्लीतील ७० वर्षानंतर या संमेलनाची पुनरावृत्ती होत आहे.

नरेंद्र मोदी यांना आमंत्रण दिल्यानंतर त्यांनी लगेच होकार दिला. मला गुरूस्थानी असलेले यशवंत राव चव्हाण उत्तम साहित्यिक होते, त्यामुळे मी सुद्धा उत्तम लिहिता झालो. इतकी संमेलनं झाली, माञ केवळ चार महिलांनाच संमेलनाचं अध्यक्षपद मिळालं. तारा भवाळकर यांना संमेलनाचं अध्यक्षपद मिळालं हे आनंददायी आहे. दिल्ली आणि महाराष्ट्राचे एक नातं आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीचे राजकीय आणि सांस्कृतिक संबंध आहेत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Marathi Literature Conference 2025
Shirdi News : साखळी गळ्याभोवती बांधायची, लॉक लावून ठेवायची; भंगार गोळा करणाऱ्या महिलेच्या कृत्यानं काळीज पिळवटलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com