

नेपाळला ३५ वर्षीय बालेन शाह यांच्या रूपाने नवे पंतप्रधान मिळणार
रामनवमीच्या दिवशी शपथविधी होणार
निर्णयाला धार्मिक आणि सामाजिक संदेशाचे महत्त्व
नेपाळच्या राजकारणात नवं सरकार स्थापन होणार आहे. ३५ वर्षीय तरुण नेते बालेंद्र शाह हे पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. बलेंद्र शाह २७ मार्च रोजी म्हणजेच रामनवमीच्या दिवशी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या निर्णयाकडे केवळ एक तारीख म्हणून नव्हे, तर एक मोठा राजकीय आणि सामाजिक संदेश म्हणून पाहिले जात आहे. शाह यांनी सीतेचे जन्मस्थान मानल्या जाणाऱ्या जनकपूरमधून आपल्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला होता. आता रामनवमीच्या दिवशी ते शपथ घेणार आहेत.
इंडियन एक्सप्रेसमधील एका वृत्तानुसार, तज्ज्ञांच्या मते, हे पाऊल नेपाळच्या लोकांच्या श्रद्धेचा स्वीकार करणारे आहे हे दाखवत आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी प्राध्यापक एस. डी. मुनी यांच्या मते, बालेंद्र शाह यांचे हे पाऊल लोकांच्या भावनांशी जुडण्याचा प्रयत्न आहे. बालेंद्र शहांचे समर्थक तरुण आहेत आणि राजेशाहीला विरोध करत आले आहेत, त्यामुळे याकडे जुन्या धार्मिक राजेशाहीकडे परत जात आहेत. मुनी हे देखील स्पष्ट करतात की याकडे केवळ भारताच्या संदर्भातून पाहू नये.
त्यांच्या मते, नेपाळ नेहमीच स्वतःची एक वेगळी राष्ट्रीय आणि धार्मिक ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आले आहे, ज्यामध्ये ते रामायणाच्या परंपरेकडेही स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहते. तर प्राध्यापक संजय भारद्वाज यांच्या मते, या निर्णयाद्वारे बालेंद्र शाह असा संकेत देत आहेत की ते हिंदू अस्मितेपासून दूर जात नाहीत.
पण त्याचबरोबर ते राजेशाही काळात अस्तित्वात असलेल्या त्या प्रकारच्या हिंदुत्वाचाही उल्लेख करत नाहीत. जेव्हा राजाला भगवान विष्णूचा अवतार मानले जात असे. याचा अर्थ हे स्पष्ट आहे की, बालेंद्र शाह यांचे हे पाऊल केवळ एक धार्मिक प्रतीक नसून, एक संतुलित राजकीय संदेश आहे, ज्यामध्ये श्रद्धा आहे, पण त्याचबरोबर नव्या विचारांचाही समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.