Nepal Politics: सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू; पंतप्रधानांनी बोलवली राजकीय पक्षांची बैठक

Nepal Political Update: नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान सुशीला कार्की यांनी १२ सप्टेंबर रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. शपथ धेल्यानंतर त्यांनी पुढील वर्षी ५ मार्च रोजी सार्वत्रिक निवडणुका होतील, याची घोषणा केली. यासंदर्भात सर्व भागधारकांसोबत नियमित बैठका घेत आहेत
Nepal Political Update
Nepal’s Prime Minister Sushila Karki chairs a high-level meeting with provincial leaders ahead of the 2026 general elections.saam tv
Published On
Summary
  • नेपाळमध्ये सार्वत्रिक निवडणुका ५ मार्च २०२६ रोजी होणार आहेत.

  • नेपाळच्या सातही प्रांतांच्या मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सहभाग घेतला.

  • आगामी निवडणुका पारदर्शक आणि सुरळीत पार पडाव्यात, यासाठी तयारी सुरू

भारताच्या शेजारील देश नेपाळमध्ये सार्वत्रिक निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. पंतप्रधान सुशीला कार्की यांनी ५ मार्च रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीबाबत सर्व सात प्रांतांच्या मुख्यमंत्र्यांसोबत संयुक्त बैठक घेतली. बदललेल्या राजकीय संदर्भात संघीय आणि प्रांतीय सरकारांमधील संवाद आणि समन्वय मजबूत करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती, अशी माहिती पंतप्रधानांचे प्रेस समन्वयक राम बहादूर रावल यांनी सांगितले.

यावर्षी १२ सप्टेंबर रोजी सुशीला कार्की (७३) नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरील बंदीवरून सरकारविरुद्ध झेन- जीच्या आंदोलनानंतर तत्कालीन पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना पदावरून काढून टाकण्यात आलं. दरम्यान आज निवडणुकीच्या तयारीबाबत विविध भागधारकांशी चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी ही बैठक बोलावली होती.

Nepal Political Update
Bihar Election : बिहारमध्ये भाजप सत्तेत येणार, शरद पवारांच्या आमदाराने सांगितले गणित

मार्च महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी एकमत निर्माण करावे. या उद्देशाने पंतप्रधान सुशीला कार्की विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत तसेच 'GEN-Z' गटांसोबत बैठका घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी शनिवारी नेपाळी काँग्रेसचेय सरचिटणीस गगन थापा आणि विश्व प्रकाश शर्मा यांच्या भेटी घेतल्या आहेत. तसेच राजकीय पक्षांना निवडणुकांबाबत त्यांची स्थिती काय आहे, त्याची का भूमिका आहे, याची माहिती त्या घेत आहेत.

Nepal Political Update
Politics : हायव्होल्टेज ड्रामा! भडकलेल्या भाजप खासदाराने चालकाच्या कानाखाली मारली, नेमकं काय घडलं? VIDEO

पंतप्रधान कार्की यांच्या सचिवालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तासाभर चाललेल्या या बैठकीत निवडणुकीसाठी सरकारची तयारी, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारणे आणि निवडणुकीपूर्वी पूर्ण करावयाच्या विविध कामांवर लक्ष केंद्रित करण्यात आलंय. नेपाळी काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान कार्की यांना निवडणुकीत सहभागी होण्यासाठी त्यांच्या पक्षाच्या वचनबद्धतेचे आश्वासन दिलंय.

पक्षाचे नेते गगन थापा आणि विश्व प्रकाश शर्मा यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की, नेपाळी काँग्रेस लवकरच 'GEN-Z' गटांसह इतर राजकीय पक्षांशी चर्चा करणार आहेत. दरम्यान या वर्षी सप्टेंबरमध्ये काळजीवाहू सरकार स्थापन झाल्यानंतर २१ ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांनी प्रथमच प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. त्यांच्याशी सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारी आणि सुरक्षा मुद्द्यांवर चर्चा केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com