Nepal Flood: महामारीचं संकट! एकाच घरातून २३ मृतदेह बाहेर काढले, ४००० अजूनही बेपत्ता, आतापर्यंत ९६२ जणांचा बळी

Nepal Flood Crisis: नेपाळमध्ये आलेल्या महापुरानंतर देशावर नवं संकट आले आहे. या पुरामध्ये आतापर्यंत ९६२ नागरिकांचा मृत्यू झाला. तर ४००० जण अद्यापही बेपत्ता आहेत.
Nepal Flood: महामारीचं संकट! एकाच घरातून २३ मृतदेह बाहेर काढले, ४००० अजूनही बेपत्ता, आतापर्यंत ९६२ जणांचा बळी
Nepal FloodSaam Tv
Published On
  • नेपाळ महापुरात ९६२ जणांचा मृत्यू

  • महापुरात ४००० हून अधिक नागरिक बेपत्ता

  • नेपाळमध्ये एकाच घरातून २३ मृतदेह बाहेर काढले

  • महापुरानंतर नेपाळमध्ये महामारीचा धोका वाढला

  • नेपाळच्या पूरग्रस्त भागात रोगराई पसरली

नेपाळमध्ये महापुरानं हाहाकार केला आहे. २६ ऑगस्ट रोजी आलेल्या महापुरामुळे नेपाळमध्ये आतापर्यंत ९६२ जणांचा मृत्यू झाला. तर ४००० पेक्षा अधिक जण अद्यापही बेपत्ता आहे. नदीकाठावर मृतदेहांचा खच पाहायला मिळत आहे. या महापुरानंतर नेपाळमध्ये महामारीचं नवं संकट आलं आहे. याठिकाणी आता रोगराई वाढू लागली आहे. मृतदेह सडू लागल्यामुळे बचावकार्यात आणि शोध मोहिमेमध्ये अडथळे येत आहेत.

नुवाकोट जिल्ह्यातील वेत्रावती येथे बचावकार्यादरम्यान एकाच घरातून २३ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. नेपाळमधील पुराचे परिणाम भारतीय नद्यांमध्येही दिसून येत आहेत. भारतीय सीमेला लागून वाहणाऱ्या गंडक नदीत २३ मृतदेह सापडले आहेत. भारत सरकार आता हे मृतदेह नेपाळी यंत्रणांच्या ताब्यात देण्याची तयारी करत आहे.

Nepal Flood: महामारीचं संकट! एकाच घरातून २३ मृतदेह बाहेर काढले, ४००० अजूनही बेपत्ता, आतापर्यंत ९६२ जणांचा बळी
नेपाळ पूरग्रस्तांसाठी ‘सकाळ’चा मदतीचा हात; मदत कुठे आणि कशी पाठवणार? VIDEO

नेपाळमधील पुरामुळे मृत्यू झालेल्यांची आणि नदीतून वाहून आलेल्या मृतदेहांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महापूर येऊन अनेक दिवस उलटले असले तरी बेपत्ता नागरिकांची संख्या हजारोच्या घरातच आहे. जवळपास ४००० लोक अजूनही बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. रसुवा जिल्ह्यातील उत्तरगया गावातील सुमारे ३५० विद्यार्थी बेपत्ता आहेत. बेपत्ता नागरिकांना शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Nepal Flood: महामारीचं संकट! एकाच घरातून २३ मृतदेह बाहेर काढले, ४००० अजूनही बेपत्ता, आतापर्यंत ९६२ जणांचा बळी
Nepal Flood: नेपाळमध्ये महापूरामुळे विध्वंस! ६१६ जणांचा मृत्यू, २५०० जण वाहून गेले; ३२० भारतीय बेपत्ता

त्रिशुली ३ए जलविद्युत प्रकल्पात ४० ते ४२ इंजिनिअर्स अडकले आहेत. सहाव्या दिवशीही बचावकार्य सुरू झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनेच्या वेळी या प्रकल्पात अंदाजे ४० ते ४२ अभियंते इंजिनिअर्स होते. त्रिशुली ३बी जलविद्युत प्रकल्पही अशाच परिस्थितीचा सामना करत आहे. त्रिशुली ३बी जलविद्युत प्रकल्पात ११८ लोक अडकले आहेत. या ११८ लोकांमध्ये इंजिनिअर्स , इतर अधिकारी आणि कामगारांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. ते बेपत्ता असून त्यांचाही शोध घेतला जात आहे.

Nepal Flood: महामारीचं संकट! एकाच घरातून २३ मृतदेह बाहेर काढले, ४००० अजूनही बेपत्ता, आतापर्यंत ९६२ जणांचा बळी
Nepal Flood: '२० मिनिटांत पाणी पोहचेल ', नेपाळमध्ये पुन्हा महापूर येणार; ५ पट धोका वाढला, प्रशासनाकडून अलर्ट जारी

नेपाळमधील पूरग्रस्त भागांमध्ये साथीच्या रोगाचा धोका आता अधिकच वाढत चालला आहे. या महापुरानंतर ७ दिवसांनी दुर्गंधी पसरू लागली आहे. ढिगाऱ्याखाली आणि दलदलीत अडकलेले मृतदेह सडून लागले आहेत. या परिस्थितीत बचावकार्य, स्वच्छता आणि साथीच्या रोगाचा प्रसार रोखण्याच्या आव्हानाला आता यंत्रणांसमोर सामोरे जावे लागत आहे. नेपाळ सरकारचे टेन्शन आता आणखी वाढले आहे.

Nepal Flood: महामारीचं संकट! एकाच घरातून २३ मृतदेह बाहेर काढले, ४००० अजूनही बेपत्ता, आतापर्यंत ९६२ जणांचा बळी
Nepal Flood : नेपाळमध्ये पुराचा हाहाकार! महाराष्ट्रातील ६० नागरिक बेपत्ता, कुठल्या जिल्ह्यातील किती पर्यटक अडकले?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com