संसदेच्या आत आणि बाहेर सरकारची कोंडी, विरोधकांनी घेरलं, संसदेचं कामकाज रखडलं

NEET Row Rocks Parliament: नीटच्या मुद्यावरून दिल्लीत सीजेपीच्या आंदोलकांनी सरकारला घाम फोडल्यानंतर विरोधकांनीही संसदेत चोहोबाजूंनी सरकारला घेरलं. त्यामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडे धाव घेतली.? प्रधान आणि शाह भेटीत नेमकं काय झालं? अधिवेशनाचा पहिला दिवस कशामुळे गाजला? पाहूयात हा विशेष रिपोर्ट......
Opposition leaders protest inside Parliament over the NEET controversy as Education Minister Dharmendra Pradhan meets Amit Shah amid mounting pressure.
Opposition leaders protest inside Parliament over the NEET controversy as Education Minister Dharmendra Pradhan meets Amit Shah amid mounting pressure.saam tv
Published On

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरूवातीलाच मोदी सरकारला मोठ्या अग्निपरीक्षेचा सामना करावा लागतोय. नीटच्या पेपर लीकवरून सीजेपीनं दिल्लीतल्या रस्त्यांवर संसदेच्या बाहेर लढाई सुरू केलेली असताना विरोधकांनी मोदी सरकारला संसदेत घेरलंय. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी याची झलक विरोधकांनी दाखवली. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज वारंवार स्थगित करावं लागलं.

लोकसभा 5 वेळा तहकूब

दिवसभरासाठी राज्यसभेचं कामकाज स्थगित

राज्यसभा 4 वेळा तहकूब

दिवसभरासाठी लोकसभेचं कामकाज स्थगित

आंदोलकांच्या मागण्यांसदर्भात चर्चा करण्यासाठी विरोधकांनी मागणी करताच सर्वोच्च सभागृह असलेली राज्यसभा एकदा दोनदा नव्हे तर ४ वेळा तहकूब करण्याची वेळ आली अखेर विरोधकांचा गोंधळ वाढल्यानंतर दिवसभरासाठी राज्यसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं तर लोकसभेतही विरोधकांनी गोंधळ घातल्यानं 5 वेळा लोकसभा तहकूब करावी लागली तरी देखिल विरोधकांच्या प्रंचड आक्रमक बाण्यामुळे शेवटी लोकसभेचं कामकाजही उद्यापर्यंत स्थगित करण्याची वेळ आली.

नीट पेपर लीक आणि प्रधानांच्या राजीनाम्याच्या मुद्यावर एकत्र झालेल्या विरोधकांचा रुद्रावतार पाहिल्यानंतर सरकारनं तिढा सोडवण्यासाठी हालचाली सुरू केल्या. आणि त्यानंतर धर्मेंद्र प्रधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दाखल झाले. त्यामुळे प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हालचाली सुरू आहेत की काय याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे विरोधकांनीही हा प्रधानांच्या राजीनाम्याचा मुद्दा लावून धरला.

नीटच्या मुद्यावरून विरोधकांनी सरकारला सुरूवातीपासून लक्ष्य केलं होतं. मात्र सीजेपीनं या मुद्यावरून सुरू केलेली मोहीम विरोधी पक्षांना बळ देणारी ठरली. आणि त्यामुळेच पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या सरकारला सीजेपीनं घेरलेलं असताना तापलेल्या वातावरणात विरोधकांनीही संसदेत सरकारला घेरण्याची आयती संधी साधली. त्यामुळे प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय संसदेचं कामकाज चालण्याची शक्यता कमीच दिसतेय. मात्र आता धर्मेंद्र प्रधान यांना पंतप्रधान मोदी अभय देणार की त्यांची उचलबांगडी करणार याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com