नवी दिल्ली : झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएने रांचीमध्ये शुक्रवारी जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा केली. रांचीमध्ये भाजपच्या प्रदेश कार्यालयात शुक्रवारी भाजप आणि आजसूने पत्रकार परिषदेत जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. झारखंडमध्ये भाजप ६८, आजसू १०, जेडीयू २ आणि लोजपा १ जागेवर निवडणूक लढणार आहे. झारखंडमध्ये एकूण ८१ विधानसभा मतदारसंघ आहेत.
झारखंडमध्ये भाजप प्रभारी शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं की, झारखंडचे भाजप, आजसू, लोजपा आणि जेडीयू एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. आम्ही एकत्र प्रचार करणार आहोत. पत्रकार परिषदेत झारखंड भाजप प्रदेशाध्यक्ष बाबूलाल मरांडी, हेमंत बिस्वा सरमा, शिवराज सिंह चौहान आणि आजसू प्रमुख सुदेश महतो उपस्थित होते.
मिळालेल्या माहितीनुसार, आजसू पक्ष सिल्ली, गोमिया, पाकुड, जुगसलाई, ईचागड, रामगड, मांडू, लोहारदगा, डुमरी आणि मनोहरपूर या मतदारसंघात उमेदवार उभे करणार आहेत.
झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात ४३ जागांवर १३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात ३८ जागांवर २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. यानंतर २३ नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. झारखंडमध्ये ८१ विधानसभा मतदारसंघ असून तेथे एकूण २.६ कोटी मतदार आहेत. यामध्ये १.२९ कोटी महिला आहेत. तर १.३१ कोटी पुरुष आहेत. तर या निवडणुकीत ११ लाखांहून अधिक मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत.
दरम्यान, झारखंडमधील ८१ जागांवर राजकीय पक्षांमध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे. झारखंडमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी ४२ आकडा हा मॅजिक फिगर आहे. मागील म्हणजे २०१९ साली विधानसभा निवडणुकीत ३० जागा जिंकून झारखंड मुक्ती मोर्चा सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.