देशात तिसऱ्या राष्ट्रवादी पक्षाची स्थापना! महिला नेत्याने केली घोषणा, राजकारणात खळबळ

Third Nationalist Party Launched In India: नवज्योत सिंग कौर यांनी भारतीय राष्ट्रवादी पार्टीची स्थापना केली आहे. २०२७ मध्ये होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकांपूर्वी ही घटना पंजाबच्या राजकारणात मोठी खळबळ निर्माण करीत आहे.
Navjot Singh Kaur unveils the new Indian Nationalist Party logo during the announcement.
Navjot Singh Kaur unveils the new Indian Nationalist Party logo during the announcement.Saam Tv
Published On

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत सिंग कौर यांनी नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी ही माहिती 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिली. त्यांनी 'एक्स'वर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये नवीन पक्षाचे नाव 'भारतीय राष्ट्रवादी पार्टी' असे ठेवल्याचे सांगितले आहे. २०२७ मध्ये पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर नवीन पक्षाची स्थापना झाल्याने पंजाबच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी म्हटले की, आम्ही राष्ट्रीय स्तरावर एक नवीन पर्याय निर्माण करण्यासाठी काम केले आहे. आम्ही सध्याच्या राजकीय नेत्यांचे कार्य आणि कामगिरी काळजीपूर्वक पाहिली आणि समजून घेतली आहे.आम्हाला आमचे जीवन देशाला समर्पित करायचे आहे, आणि लोकांना ज्याची खरोखर गरज आहे आणि आमच्याकडून अपेक्षा आहे, ते त्यांना द्यायचे आहे. असे कौर यांनी म्हटले आहे.

Navjot Singh Kaur unveils the new Indian Nationalist Party logo during the announcement.
Onion Farmers Protest | शेतकरी दिल्लीत धडकणार,आक्रमक शेतकऱ्यांनी Bharati Pawar यांना जाब विचारला

नवज्योत सिंग कौर यांच्या पक्षाच्या घोषणेवेळी त्यांचे पती नवज्योत सिंग सिद्धू उपस्थित नव्हते. काँग्रेस पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर, कौर भाजपच्या जवळ जात असून त्यात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता नवज्योत सिंग कौर यांनी स्वतःच्या पक्षाची घोषणा केल्याने पंजाबचे राजकरणात याचा काय परिणाम होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com