भारतातील इतिहास, संस्कृती वारशाचा आपण अभिमान बाळगतो, मात्र त्याच्या संरक्षणाबाबत अनेकदा निष्काळजीपणा दिसून येतो. स्मरकांची तोडफोड, मूर्ती आही प्राचीन वस्तूंची चोरी यांसारख्या घटनांनंतर आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशातील ऐतिहासिक नरवर किल्ल्यातून सुमारे 3000 किलो वजनाची शिंदे काळातील तोफ चोरट्यांनी रात्रीतून पळवून नेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 15 ते 16 जुलैच्या रात्री सुमारे 25 ते 30 जण शस्त्र घेऊन किल्ल्यात शिरले. किल्ल्यातील कचहरी परिसरात ठेवलेल्या 14 ऐतिहासिक तोफापैकी एक तोफ त्यांनी चोरी केली. सुरक्षा रक्षकांना धमकावत त्यांनी ही कारवाई केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर किल्ल्यात आता 14 ऐवजी 13 तोफा शिल्लक राहिल्या आहेत.
विशेष म्हणजे या चोरीपूर्वी सुमारे 12 दिवसांपासून किल्ल्याभोवती संशयास्पद हालचाली दिसत होत्या. मात्र याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही आणि सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली नाही, अशी माहिती समोर येत आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, आरोपी पूर्ण तयारीनिशी आले होते. ३,००० किलो वजनाची तोफ हलवण्यासाठी त्यांनी क्रेन आणि ट्रकचा वापर केला. किल्ल्याच्या मागील बाजूने प्रवेश करून त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने ही चोरी केली आणि पसार झाले.
चोरीस गेलेली ही तोफ केवळ लोखंडी वस्तू नसून ती भारताच्या लष्करी इतिहासाचा महत्त्वाचा भाग मानली जाते. तज्ञांच्या मते, ही तोफ १६व्या शतकातील असून त्या काळातील धातुकाम आणि युद्धतंत्रज्ञानाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. तिच्यावर असलेली नक्षीकाम आणि ऐतिहासिक चिन्हे तिचे महत्त्व अधिक वाढवतात.
पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आंतरराष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक वस्तूंच्या तस्करीशी याचा संबंध आहे का, याचाही तपास केला जात आहे. अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. सायबर सेलही या प्रकरणाची चौकशी करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.