Shreya Maskar
बाळापूर किल्ला हा अकोला जिल्ह्यातील एक मुघलकालीन किल्ला आहे. अकोल्यापासून सुमारे २६ किमी अंतरावर 'मान' आणि 'म्हैस' नद्यांच्या मधल्या उंच भूभागावर हा किल्ला वसलेला आहे.
१७१२ ते १७५७ या काळात बांधलेल्या बाळापूर किल्ल्यात विटांच्या उंच भिंती, तीन प्रवेशद्वारे आणि बाला देवीचे मंदिर आहे.
बाळापूर किल्ला हा १८ व्या शतकातील मुघलांचा एक महत्त्वाचा लष्करी तळ होता. मराठ्यांच्या आक्रमणांपासून बचाव करण्यासाठी आणि व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता.
बाळापूर किल्ल्याच्या बाह्य भिंतींचा आकार दशकोनी (१० बाजू असलेला) आहे, तर आतील भिंतींचा आकार पंचकोनी आहे. या दोन्ही आकारांच्या प्रत्येक कोपऱ्यावर मजबुतीसाठी गोलाकार बुरूज बांधण्यात आले आहेत.
बाळापूर किल्ल्याचे बांधकाम मुघल सम्राट औरंगजेब याचा मुलगा मिर्झा आझम शाह याच्या काळात १७२१ मध्ये सुरू झाले. पुढे १७५७ मध्ये एलीचपूरचा नवाब इस्माईल खान याने या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले.
मुंबई ते अकोला ट्रेनने प्रवास करा. पुढे अकोल्यापासून किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत रिक्षा किंवा टॅक्सीने जा.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.