नगरसेवक ते राष्ट्रपतीपदापर्यंत निवडणूक लढवण्याचा विक्रम करणारे नागरमल बाजोरिया उर्फ धरतीपकड यांचे गुरुवारी उपचारादरम्यान निधन झाले. ते 97 वर्षांचे होते, पटना येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. भागलपूर येथील एमपी द्विवेदी रोडवरील देवी बाबू धर्मशाळेजवळ ते वास्तव्यास होते.
नागरमल बाजोरिया यांनी तब्बल 280 निवडणुका लढवून एक अनोखा विक्रम केला होता. नगर पालिकेच्या निवडणुकीपासून विविध मोठ्या निवडणुकांमध्ये त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे ते कायम चर्चेत राहिले. त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विरोधात रायबरलीमधून, राजीव गांधी यांच्याविरोधात अमेठीतून निवडणूक लढवली होती. तसेच संजय गांधी, अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांसारख्या दिग्गज नेत्यांविरोधातही त्यांनी निवडणूक लढवली.
धरतीपकड नागरमल बाजोरिया यांनी 2012 मध्ये प्रणव मुखर्जी यांच्या विरोधात राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांचा अर्ज बाद झाला. कुटुंबियांच्या माहितीनुसार, 1969 मध्ये त्यांनी तत्कालीन राष्ट्रपतीपदाचे उमेदवार व्ही.व्ही. गिरी यांच्या विरोधातही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी आपली शेवटची निवडणूक 2019 मध्ये लढवली. विशेष म्हणजे 280 निवडणुका लढवूनही त्यांना एकाही निवडणुकीत विजय मिळवता आला नाही.
त्यांचे नातेवाईक आलोक कुमार अग्रवाल यांनी सांगितले की नागरमल बाजोरिया यांचे पार्थिव गुरुवारी रात्री नऊ वाजता पटना येथून भागलपूर येथे आणण्यात आले. त्यांच्यावर बरारी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.