घामाच्या दुर्गंधीपासून वाचण्यासाठी आणि सुंगधासाठी अनेक जण परफ्यूमचा वापर करतात. यामुळे दुर्गंधीपासून सुटका मिळून सुंगधामुळे फ्रेशही वाटतं. मात्र डीजीसीएकडून वैमानिकांना परफ्युम वापरू नये असे निर्देश लवकरच जारी करण्यात येतील अशी शक्यता आहे. (Latest Marathi)
विमान उड्डाण करणे फार जोखमीचे काम आहे. वैमानिक तसेच केबिन कर्मचाऱ्यांनी विमान उड्डाण करण्यापूर्वी परफ्युम लावणे टाळले पाहिजे. तसेच विशिष्ट प्रकारच्या माऊथवॉशचा उपयोग करणे टाळावे. कारण यामध्ये अल्कोहोलचा वापर असतो. त्यामुळे या गोष्टी टाळाव्यात असं डीजीसीने म्हटलं आहे.
याकरिता सिव्हिल एव्हिएशनच्या नियमांत बदल करण्यासाठी चाचपणी करण्यात आलीय. यानियमात बद्दल करण्यासाठी डीजीसीएने हालचाली सुरू केल्यात.
या संबंधित सूचना आणि प्रस्ताव हाती आल्यानंतर त्या अनुषंगाने विमान प्रवासादरम्यान वैमानिक आणि केबिन कर्मचाऱ्यांना परफ्युम, माऊथवॉश तसेच विशिष्ट प्रकारच्या औषधांवर बंदी घालण्यासंर्दभातील निर्देश जारी करण्याचे संकेत आहेत.
काय आहे कारण?
परफ्युम, माऊथवॉश काही औषधे यामध्ये विशिष्ट प्रमाणात अल्कोहोलची मात्रा असते. त्यामुळे मद्यप्राशन केले नसले तरी या गोष्टीच्या वापरामुळे वैमानिकांच्या 'ब्रेथ अॅनालायझर' चाचणीमध्ये अल्कोहोलचे प्रमाण पॉझिटिव्ह येऊ शकते. तसे आल्यास वैमानिकांना उड्डानास मनाई केली जाऊ शकते. याच पार्श्वभूमीवर बचावात्मक योजना म्हणून या निर्देशांची अंमलबजावणी करण्याचा विचार सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.