Mukhtar Ansari : माजी आमदार मुख्तार अन्सारीला जन्मठेपाची शिक्षा; काय आहे नेमकं प्रकरण?

Mukhtar Ansari Latest News : उत्तर प्रदेशमधील माजी आमदार मुख्तार अन्सारीला मोठा धक्का बसला आहे. कोर्टाने मुख्तार अंसारीला बनावट शस्त्र परवाना प्रकरणी जन्मठेपाची शिक्षा सुनावली आहे.
Mukhtar Ansari
Mukhtar AnsariSaam Tv
Published On

Mukhtar Ansari life imprisonment :

उत्तर प्रदेशमधील माजी आमदार मुख्तार अन्सारीला मोठा धक्का बसला आहे. कोर्टाने मुख्तार अन्सारीला बनावट शस्त्र परवाना प्रकरणी जन्मठेपाची शिक्षा सुनावली आहे. वाराणसीच्या एमपी एमएलए कोर्टाने मुख्तार अन्सारीला ३६ वर्ष जुन्या प्रकरणात शिक्षा सुनावली आहे. (Latest Marathi News)

वाराणसीच्या एमपी एमएलए कोर्टात न्यायाधीश अवनीश गौतम यांनी कोर्टात माजी आमदार मुख्तार अन्सारीला जन्मठेपाची शिक्षा सुनावली. तसेच कोर्टाने त्याला दोन लाख दोन हजार रुपये दंड ठोठावला आहे. अन्सारीला व्हिडिओ कॉन्फ्रेसिंगद्वारे हजर करण्यात आलं होतं. मुख्तारला आतापर्यंत ७ जणांना शिक्षा मिळाली आहे. हा आता आठव्या प्रकरणात शिक्षा मिळाली आहे.

Mukhtar Ansari
Haryana Floor Test: प्लोअर टेस्टमध्ये 'नायब' सरकार पास; आवाजी मतदानाने पारित झाला प्रस्ताव

काय आहे नेमकं प्रकरण?

मुख्तार अन्सारीने १० जून १९८७ दरम्यान दोनाली बंदूक परवानासाठी गाझीपूर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं होतं. गाझीपूर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना बनावट सही करून शस्त्र परवाना मंजूर करून घेतला होता.

या प्रकरणी ४ डिसेंबर १९९० गाझीपूरच्या मोहम्मदाबाद ठाण्यात मुख्तार अन्सारी,तत्कालीन उप जिल्हाधिकारीसहित पाच जणांनावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस तपासानंतर तत्कालीन लिपीक गौरीशंकर आणि मुख्तार अन्सारी यांच्याविरोधात १९९७ मध्ये दोषारोप पत्र कोर्टात दाखल केलं होतं.

Mukhtar Ansari
Hyderabad Women attacks : भररस्त्यात राडा! नगरसेविकेवर महिलांच्या गटाचा हल्ला, VIDEO

मुख्तार अन्सारी हा कोर्टात कलम ४२०, ४६७ , ४६८ या कलमान्वये दोषी आढळला. त्यानंतर कोर्टाने त्याला शिक्षा सुनावली. भारतीय दंड संहिता नियामांतर्गत कमीत कमीत १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात येते. तसेच मुख्तार हा शस्त्र कायदा, कलम ३० या नुसार दोषी सिद्ध झाला होता. या कलमान्वये ६ महिन्यांची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com