Hyderabad Women attacks : भररस्त्यात राडा! नगरसेविकेवर महिलांच्या गटाचा हल्ला, VIDEO

Hyderabad Woman corporator Attacked: भारत राष्ट्र समितीच्या (BRS) नगरसेविका देदीप्य राव या कारने जात असतानाच अनोळखी महिलांच्या गटानं त्यांच्यावर हल्ला केला. हैदराबादच्या ज्युबिली हिल्स येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास हा हल्ला झाला.
Hyderabad Women attacks
Hyderabad Women attacksSaam TV
Published On

Viral Video :

महिलांच्या एका गटानं कारमधून जात असलेल्या महिला नगरसेविकेवर अचानक हल्ला चढवला. हैदराबाद येथील ज्युबिली हिल्स परिसरात ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपी महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Hyderabad Women attacks
Sara Ali Khan: मी सारा अली खान... ; मराठी भाषेत बोलताच टाळ्या आणि शिट्ट्या वाजल्या, VIDEO व्हायरल

भारत राष्ट्र समितीच्या (BRS) नगरसेविका देदीप्य राव या कारने जात असतानाच अनोळखी महिलांच्या गटानं त्यांच्यावर हल्ला केला. हैदराबादच्या ज्युबिली हिल्स येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास हा हल्ला झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ज्युबिली हिल्स (Jubilee hills Police) पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून, या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली असल्याची माहिती पोलीस अधिकारी आर मधुसुदन यांनी दिली. महिला नगरसेविकेवर हल्ला करणाऱ्या संशयित आरोपी महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची अधिक माहिती घेत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

हल्ल्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल

नगरसेविकेवरील हल्ल्याच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. महिलांचा गट प्रचंड आक्रमक झाला असून, नगरसेविका राव यांना ते कारच्या बाहेर खेचताना दिसत आहेत. कारचा चालक मध्यस्थी करत असून, नगरसेविकेला वाचवायचा प्रयत्न करत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. या घटनेमुळे रस्त्यावर प्रचंड गोंधळ झाल्याचं दिसतंय.

मिळालेल्या माहितीनुसार, बॅनरवरून हा वाद असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यावरून महिला नाराज होत्या. त्यातूनच नगरसेविका देदिप्य राव यांच्यावर हा हल्ला झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या हल्ल्यात राव जखमी झाल्या आहेत. या हल्ल्याच्या घटनेनंतर नगरसेविका राव यांची प्रतिक्रिया आली आहे. काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला असावा, अशी शक्यता राव यांनी व्यक्त केली आहे.

Hyderabad Women attacks
Viral Video: समुद्रात फोटोशूट करणं बेतलं जीवावर; लाट आली अन् तरुणीला क्षणात घेऊन गेली, थरारक VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com