Haryana Floor Test: प्लोअर टेस्टमध्ये 'नायब' सरकार पास; आवाजी मतदानाने पारित झाला प्रस्ताव

Haryana Floor Test : मनोहरलाल खट्टर यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर नायब सैनी यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती. हरियाणाच्या ९० जागांच्या विधानसभेत भाजपचे ४१ आमदार आहेत. तर एकूण ७ अपक्ष आमदारांपैकी ६ जणांचा भाजपचं समर्थन आहे.
Haryana Floor Tes
Haryana Floor TesSaam Tv
Published On

Chief Minister Nayab Singh Saini wins Floor Test :

हरियाणा येथील राजकीय नाट्यानंतर आता नव्या सरकारचे तिथे स्थापना झाली आहे. हरियाणाचे नवीन मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी विधानसभेच बहुमत देखील मिळवलं आहे. आवाजी मतदानाने सैनी सरकारने विधानसभेत बहुमत चाचणी जिंकली. अविश्वास ठरावावर बोलताना, मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचं तोंडभरुन कौतुक केलं. (Latest News)

मनोहरलाल खट्टर यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर नायब सैनी यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती. हरियाणाच्या ९० जागांच्या विधानसभेत भाजपचे ४१ आमदार आहेत. तर एकूण ७ अपक्ष आमदारांपैकी ६ जणांचा भाजपचं समर्थन आहे. तर हरियाणा लोकहित पार्टीचे एकमेव आमदार गोपाल कांडा यांचा देखील भाजपला पाठिंबा आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मनोहरलाल खट्टर यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री नायब सैनी यांच्यासोबत भाजपच्या ४ आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्याच्या ९० सदस्यीय विधानसभामध्ये भाजपाचे ४१ आमदार आहेत. येथे भाजपला ७ अपक्ष आमदारांमधील ६ आमदारांचा पाठिंबा आहे.

तसेच हरियाणा लोकहित पक्षाचे एका आमदाराचाही पाठिंबा भाजपला आहे. मंगळवारी भाजप आमदारांची बैठक झाल्यानंतर आमदार सुभाष सुधा आणि जेपी दलाल यांनी सैनी राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील,अशी घोषणा केली होती. दरम्यान ५४ वर्षीय सैनी हे खट्टर यांचे निकटवर्तीय आहेत. सैनी यांच्यासह भाजपच्या चार आणि एक अपक्ष आमदाराने मंत्रीपदाची शपथ मंगळवारी घेतली.

Haryana Floor Tes
Naib Singh Saini : नायब सिंग सैनी यांनी घेतली हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ; मनोहर लाल खट्टर देखील उपस्थित

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com