Crime: बाळ सतत रडत असल्याने आई संतापली, चुलीमध्ये टाकून जिवंत जाळलं

Hyderabad Crime: हैदराबादमध्ये एका महिलेने आपल्या दोन महिन्यांच्या बाळाची हत्या केली. बाळ सतत रडत असल्याने तिने त्याला चुलीत टाकून जिवंत जाळले. या घटनेमुळे हैदराबादमध्ये खळबळ उडाली आहे.
Crime: बाळ सतत रडत असल्याने आई संतापली, चुलीमध्ये टाकून जिवंत जाळलं
Hyderabad CrimeSaam Tv
Published On

Summary -

  • हैदराबादमध्ये आईने दोन महिन्यांच्या बाळाची हत्या केली

  • बाळाला चुलीत टाकून जिवंत जाळलं

  • बाळ सतत रडत असल्याने संतापाच्या भरात केलं भयंकर कृत्य

  • पोलिसांनी आरोपी महिलेला अटक करून गुन्हा दाखल केला

हैदराबादमध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली. आईनेच आपल्या दोन महिन्यांच्या बाळाची हत्या केली. मुलगा सतत रडतो यामुळे संतप्त होत आईने आपल्या बाळाची निर्घृण हत्या केली. महिलेने बाळाला चुलीमध्ये टाकून जिवंत जाळलं. या घटनेमुळे हैदराबाद हादरले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाचे वडील राजेंद्र सकाळी कामावरून घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला. राजेंद्रला त्याची बायको ममता आपल्या मुलाला चुलीमध्ये टाकून जाळताना दिसली. आरोपी महिलेने बाळ ओरडू नये यासाठी त्याच्या तोंडात कापड कोबंले होते आणि त्याच्या डोळ्यांवर पट्टी बाधली होती. त्यानंतर तिने बाळाला चुलीत टाकून दिले. वडील घरी येईपर्यंत उशिर झाला होता. तोपर्यंत बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

Crime: बाळ सतत रडत असल्याने आई संतापली, चुलीमध्ये टाकून जिवंत जाळलं
Crime: बॉयफ्रेंडच्या समोर तरुणीवर सामूहिक बलात्कार, कार अडवून आधी दोघांना मारहाण, नंतर...

मूळचे मध्य प्रदेशचे असणारे राजेंद्र आणि ममता हे हैदराबाद येथे राहत होते. ते याठिकाणी एका अपार्टमेंटमध्ये सुरक्षारक्षक आणि कामगार म्हणून काम करत होते. मुलाच्या हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अर्धवट जळालेल्या अवस्थेतील बाळाचा मृतदेह ताब्यात घेत पोलिसांनी तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

Crime: बाळ सतत रडत असल्याने आई संतापली, चुलीमध्ये टाकून जिवंत जाळलं
Crime: तरुणाकडून बायको आणि ३ मुलींची हत्या; चाकूने चौघांचा गळा चिरला; दिल्ली हादरली

बाळ सतत रडत असल्यामुळे महिलेला राग अनावर झाला आणि तिने हे कृत्य केले असल्याचे सांगितले जात आहे. बाळाची काळजी घेण्यासाठी कुणाचीही मदत मिळत नसल्यामुळे आरोपी महिला प्रसूतीनंतर नैराश्येत गेली होती का? याचा तपास पोलिस करत आहेत. या घटनेमुळे हैदराबादमध्ये खळबळ उडाली आहे.

Crime: बाळ सतत रडत असल्याने आई संतापली, चुलीमध्ये टाकून जिवंत जाळलं
Crime: मंदिरामध्ये गोळ्या झाडून व्यापाऱ्याची हत्या, भावालाही सोडलं नाही; गोळीबाराच्या आवाजाने परिसर हादरला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com