धोक्याची घंटा! 15 दिवसांत तब्बल 15 देशांमध्ये मंकीपॉक्सचा प्रसार

ताज्या अपडेटनुसार, सध्या जगभरात मंकीपॉक्सची 219 प्रकरणे आहेत
Monkeypox Virus News Updates, Monkeypox Virus Latest Marathi News
Monkeypox Virus News Updates, Monkeypox Virus Latest Marathi NewsSaam Tv
Published On

नवी दिल्ली : कोरोना (Corona) महामारीपासून जगाला काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी, आता मंकीपॉक्स (Monkeypox) नावाच्या नवीन व्हायरसने धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. अवघ्या 15 दिवसांत मंकीपॉक्स व्हायरस तब्बल 15 देशांमध्ये पसरला आहे. अमेरिका (America), ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, आफ्रिका देशात मंकीपॉक्सचा प्रसार झपाट्याने होत आहे. ताज्या अपडेटनुसार, सध्या जगभरात मंकीपॉक्सची 219 प्रकरणे आहेत. सध्या भारतात (India) या व्हायरसचे कुठलेही प्रकरण समोर आलेले नाही. तरी सुद्धा या व्हायरसबाबत सरकार सतर्क आहे. या आजाराला हलक्यात घेऊ नका असा इशारा सुद्धा डब्ल्यूएचओने दिला आहे. (Monkeypox Virus Latest Marathi News)

Monkeypox Virus News Updates, Monkeypox Virus Latest Marathi News
जेवल्यानंतर ही कामे लगेच करु नका

मंकीपॉक्स कोणकोणत्या देशात प्रसार?

मंकीपॉक्सचा सर्वाधिक कहर युरोपमध्ये आहे. मात्र, हा आजार इतर देशांमध्येही पसरत आहे. 15 दिवसांत हा आजार 15 देशांमध्ये पसरला आहे. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, इटली, फ्रान्स, स्वीडन, स्पेन, पोर्तुगाल, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, इस्रायल, कॅनडा, नेदरलँड, बेल्जियम, ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंड यांचा समावेश आहे.

मंकीपॉक्स इतक्या वेगाने का पसरतोय?

मंकीपॉक्स व्हायरसचे जीवंत कण हे अतिसुक्ष्म असल्याने त्यांना रोखणे फार कठीण आहे. मंकीपॉक्स व्हायरस संक्रमित मानव किंवा प्राण्यांच्या संपर्कात आल्यावर पसरू शकतो. त्याचा प्रसार दर 3.3 टक्क्यांवरून 30 टक्के मानला गेला आहे. पण, अलीकडे काँगोमध्ये हा दर ७३ टक्के होता. हा विषाणू जखम झालेली जागा, श्वसननलिका, डोळे, नाक किंवा तोंडातून शरीरात प्रवेश करतो.

Monkeypox Virus News Updates, Monkeypox Virus Latest Marathi News
जाणून घ्या आपल्या आहाराची योग्य वेळ कोणती?

मंकीपॉक्सचा प्रसार झपाट्याने का झाला?

डब्लूएचओचे तज्ज्ञ डॉ. डेव्हिड हेमन यांनी मंकीपॉक्सच्या उद्रेकाचे वर्णन 'अनपेक्षित घटना' म्हणून केले आहे. त्यांच्या मते युरोपमध्ये या व्हायरसचा प्रसार दोन रेव्ह पार्ट्यांमध्ये झालेल्या धोकादायक लैंगिक वर्तनामुळे झाला असावा. डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन विभागाचे प्रमुख असलेले हेमन म्हणाले की, स्पेन आणि बेल्जियममधील दोन रेव्ह पार्ट्यांमध्ये समलैंगिक आणि इतर लोकांमधील लैंगिक संबंधांमुळे या व्हायरसचा झपाट्याने प्रसार झाला.

मंकीपॉक्स कसा पसरतो?

तज्ञांच्या मते संक्रमित व्यक्ती किंवा त्यांच्या कपड्यांशी संपर्कात आल्यानंतर मंकीपॉक्स व्हायरसची लागण होण्याची शक्यता आहे. मंकीपॉक्सची लागण झालेल्या बहुतेक लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नसते. काही आठवड्यांत लोकं या आजारातून बरे होतात. मंकीपॉक्स हा एक जुनोटिक रोग असल्याने त्याच्यात प्राण्यांपासून माणसांना संसर्गित करण्याची क्षमता प्रचंड आहे. चावल्याने, ओरखाडल्याने किंवा जखमेच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संपर्काद्वारे देखील प्राण्यांपासून माणसापर्यंत या रोगाचा प्रसार होऊ शकतो.

Monkeypox Virus News Updates, Monkeypox Virus Latest Marathi News
चेहऱ्यावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी असा आहार घ्या

मंकीपॉक्सची लक्षणे काय आहेत?

मंकीपॉक्सची लागण झाली असेल, तर पहिली लक्षणे दिसण्यासाठी साधारणतः 5 ते 21 दिवस लागतात. यामध्ये ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, पाठदुखी, थरथर कापणे आणि थकवा यासारखी लक्षणे रुग्णांमध्ये दिसून येतात. ही लक्षणे दिसल्यानंतर एक ते पाच दिवसांनी चेहऱ्यावर पुरळ उठते. यामध्ये कांजण्यां सारखे पुरळ संपूर्ण शरीरावर येतात ज्याची सुरवात बहुतांश वेळा चेहऱ्यापासून होते.

मंकीपॉक्सवर उपचार काय?

सध्या या आजारावर कोणताही इलाज उपलब्ध नाही. परंतु हा आजार रोखण्यासाठी स्मॉल पॉक्स वॅक्सिन, अँटीव्हायरल आणि व्हीआयजी यांचा वापर केला जाऊ शकतो. आम्‍ही तुम्‍हाला सांगू की स्‍माल पॉक्‍स लस मंकीपॉक्‍स रोखण्‍यासाठी 85 टक्के प्रभावी ठरली आहे. मंकीपॉक्सवर अद्याप कोणताही सुरक्षित आणि सिद्ध उपचार नाही. WHO लक्षणांवर आधारित प्रतिबंधात्मक उपाय करण्याचा सल्ला देतात. संसर्ग रोखण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी जागरूकता आवश्यक आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com