मुंबई : सकाळी झोपेतून उठल्यानंतर आपल्याला भूक लागते. आणि त्यावेळी आपल्या डोक्यात पहिली गोष्ट येते ती नाश्ता कोणता करावा ? दिवसभराचा आहार कसा असावा याविषयी आपण विचार करू लागतो.
हे देखील पहा -
ज्यादिवशी आपल्या खाण्याची वेळ चुकली किंवा आपला दिवसभरातला आहार चुकला की, आपले सुरु असलेले चक्र गडबडते. आपण दिवसभरात काय खातो कसे खातो यावर लक्ष दिले पाहिजे. खाण्यात कोणते पदार्थ अधिक प्रमाणात असायला हवे. त्याची वेळ कोणती असायला हवी. आपण ठरवलेल्या वेळेनुसार आहार केला तर त्याचे आपल्या शरीरासाठी अनेक आरोग्यदायी फायदे होतात. जेवण खाण्याची योग्य वेळ कोणती आणि त्याचा आपल्या शरीराला कसा फायदा होतो ते पाहूया.
वेळेचे भान ठेवा
१. नाश्ता हा आपल्या आहारातील दिवसाचे पहिले जेवण असते. जे दिवसभर आपल्याला ताजेतवाने ठेवण्यास मदत करते. नाश्ता हा सामान्यतः रात्रीच्या (Night) जेवणानंतर ८ ते १० तासांनी खाल्ले जाते. त्यासाठी नाश्ता घेण्याची सर्वोत्तम वेळही (Time) सकाळी ७ ते ९ दरम्यान असायला हवी.
२. सकाळी नाश्ता लवकर केल्यानंतर आपल्याला जेवणासाठी पुरेसा वेळ मिळतो. तसेच नाश्त्याचे पचनही नीटसे होते. दुपारच्या १२ ते २ पर्यंत दुपारच्या जेवणाची वेळ निश्चित करा.
३. आपण दुपारचे जेवण लवकर घेतल्याने आपल्याला संध्याकाळी लवकर भूक लागते. आपली भूक भागवण्यासाठी तसेच चयापचय वाढवण्यासाठी आपण रात्रीचे जेवण लवकर खाण्याची सवय कारायला हवी. आपण रात्रीचे जेवण ६ ते ८ च्या दरम्यान करावे.
वेळेवर खाण्याचे फायदे-
१. जर आपण सर्व जेवण दररोज एका ठराविक वेळेवर खाल्ले तर आपली चयापचय वाढवण्यास मदत होईल. लवकर नाश्ता केल्याने आपल्याला प्रोत्साहन मिळते आणि रात्रीचे जेवण लवकर केल्याने चयापचय सुधारण्यास मदत होते.
२. वेळेवर खाल्यास आपले शरीर दिवसभर सक्रिय राहाते. त्यामुळे आपल्या शरीराला पुन्हा भुक लागण्याआधी ठराविक वेळेत जेवायला हवे.
३. दिवसभरातला आहार वेळेवर केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. कारण आपल्याला मधेच भूक लागत नाही यामुळे आपण स्नॅक्स आणि जंक फूड (Food) खाण्यापासून लांब राहातो.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Edited By - Komal Damudre
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.