चेहऱ्यावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी असा आहार घ्या

चेहऱ्यावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी या टिप्स फॉलो करा.
Skin care tips in Marathi, How to look beautiful, Beauty Tips in Marathi
Skin care tips in Marathi, How to look beautiful, Beauty Tips in Marathiब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : चेहरा अधिक सुंदर दिसण्यासाठी आपण रोज नवनवीन प्रयोग त्याच्यावर करत असतो. त्वचा चमकदार, गोरी व ती सुंदर दिसण्यासाठी पुरेशी नसते. चेहऱ्याला साजेसा आकार असणे ही अधिक महत्त्वाचे आहे. (Beauty Tips in Marathi)

हे देखील पहा -

आपल्या चेहऱ्यावर जास्त चरबी असली की, चेहऱ्याची त्वचा लटकत असते. अनेकदा मेकअप करून किंवा इतर अनेक उपाय करून देखील आपल्या त्वचेचा आकार बदलत नाही परंतु आपण कितीही चेहऱ्याचा व्यायाम केला पण खाण्या-पिण्यावर आपले नियंत्रण नसले तर, चेहऱ्यावर चरबी जमा व्हायला सुरुवात होते. आपल्या खाण्या-पिण्यात सोडियमचे जास्त सेवन केल्यास चेहऱ्यावर फुगीरपणा येऊ लागतो व चेहरा जाड दिसू लागतो. चेहऱ्यावरील चरबी कशी कमी करावी याविषयी जाणून घेणार आहोत.

आहारात या खाद्यपदार्थांचा समावेश करा ज्यामुळे चेहऱ्याची चरबी कमी होईल.

१. सकाळी उठल्यानंतर नियमितपणे आपण कोरफड जेलचे सेवन केले तर त्याचा चांगला परिणाम आपल्याला दिसून येईल. कोरफडचे जेल खाता येत नसेल तर आपण पाण्यासोबतही घेऊ शकतो.

Skin care tips in Marathi, How to look beautiful, Beauty Tips in Marathi
डोळ्यांना लावलेले आयलाइनर काढण्यासाठी काही टिप्स

२. आपल्या आहारात ग्लूटेन फ्री पदार्थांचा वापर आपण करायला हवा. नाचणी, बाजरी, ज्वारीची भाकरी आपण खाऊ शकतो. यासोबतच आपण या पीठापासून इतर पदार्थ देखील घरी बनवू शकतो.

३. आपण अधिक प्रमाणात पाण्याचे (Water) सेवन करायला हवे. दर एका तासाने एक ग्लास (Glass) पाणी प्यायला हवे. आपल्या शरीराला पुरेशा प्रमाणात पाणी मिळाल्याने चयापचय सुधारते आणि त्यामुळे चेहऱ्याची अतिरिक्त चरबीही कमी होते.

४. टरबूज, खरबूज, काकडी आदी पाणीदार फळे (Fruit) यांचा आपल्या आहारात अधिक प्रमाणात सेवन करायला हवे. यासोबतच आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करावा. पिष्टमय भाज्यांचे सेवन कमी करावे. तसेच, आहारात फायबर आणि प्रोटीनचा समावेश केल्यास चांगले परिणाम मिळतील.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे . कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com