महागाईच्या काळात गुजरातमध्ये पैशांचा पाऊस; गायकावर नोटांची उधळण

Money Rain On Singer In Gujarat Khambhaliya Event: गुजरातच्या खंभालिया येथे एका कार्यक्रमात गायकावर अक्षरशः नोटांचा पाऊस पडल्याची घटना समोर आली आहे. महागाईच्या काळात झालेल्या या पैशांच्या उधळणीमुळे सामाजिक आणि राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
Audience showers bundles of cash on a singer during a live event in Khambhaliya, Gujarat.
Audience showers bundles of cash on a singer during a live event in Khambhaliya, Gujarat.saam tv
Published On

एकीकडे महागाई वाढत असताना एका कार्यक्रमात अक्षरशा पैशांचा पाऊस पडलाय...होय पैशांचा पाऊस...गायकावर खुश होऊन प्रेक्षकांनी अक्षरशा नोटांचे बंडल उधळले आहेत...नेमका कुठं आणि कसा घडलाय हा प्रकार ? पाहूयात या रिपोर्टमधून...

महागाई इतकी बोकाळलीय का इचारू नका....

पण दुसरीकडं एक माणूस आख्खा नोटांमधी गाडला गेलाय....इतका पैसा इतक्या नोटा का मोजताना गणिताच्या तोंडचं पाणीच पळून जाईल... बघा ह्यो... नुसता पैशाचा पाऊस अन् पूर....

ही घटना हाय गुजरातच्या द्वारका जिल्ह्यातल्या खंभालियातली... एका कार्यक्रमात एका सिंगरवर मोक्कार पैसा उधळला...कुणी एका हातानं उधळला... कुणी दोन हातानं उधळला तर कुणी मोठ्या पिशव्यांनी नोटा उधळल्या... नुसती भिंगरी....इतक्या नोटात सिंगर टॉप टू बॉटम अंडर द नोटा...

सध्यात जागात युद्धानं तोंड वर काढलंय... पंतप्रधान साहेबांनी काटकसरीचा सल्ला दिलाय... पंतप्रधानांनी दिलेल्या सल्ल्याचं अनेक जण पालन देखील करतायत.दरम्यान ही कार्यक्रम एका संस्थेला मतदीसाठी केल्याचं बोललं जातंय. पण मदतीच्या नावावर दिखावा कशासाठी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com