Shocking : घरी लवकर पाठवल्याने महिला कर्मचारी भडकली; रागाच्या भरात बॉसला भरचौकात संपवलं

employee killed manager : अमेरिकेत रागाच्या भरात कर्मचाऱ्याने बॉसला संपवल्याची घटना घडली आहे. हत्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
crime news in Marathi
crime newsSaam tv
Published On

अमेरिकेच्या मिशिगनमधील मॅक्डोनाल्डमधील एका महिला कर्मचाऱ्याने रागाच्या भरात मॅनेजरची चाकूने हत्या केल्याची घटना घडली आहे. २६ वर्षीय महिला कर्मचाऱ्याने ३९ वर्षीय महिला मॅनेजरला १५ वेळा चाकूने भोसकलं. अफेनी मुहम्मद असे हल्ला करणाऱ्या तरुणीचे नाव आहे.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, आरोपी अफेनी मुहम्मदने एक दिवस आधीच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये मुहम्मदने ३९ वर्षीय मॅनेजर हॅरिसने धमकावल्याचा आरोप केला. मॅक्डोनाल्डमधील कर्मचारी घरी लवकर पाठवल्याच्या कारणामुळे रागात होती. अफेनी मुहम्मदने इन्स्टाग्राम व्हिडिओत म्हटलं की, 'मला काल लवकर घरी पाठवलं. आज देखील घरी लवकर पाठवलं. मी सांगत आहे की, ती खूप बदमाश आहे. मी मस्करीत सांगत नाही'.

crime news in Marathi
Beed Crime : सरपंचपदाचा राजीनामा का देत नाही? महिलेवर १५ ते २० जणांचा जीवघेणा हल्ला; बीडच्या परळीत खळबळ

अफेनी मुहम्मदने पुढे सांगितलं की, 'माझी मॅनेजर एक आई असून तिला मुलं आहेत. याचा अर्थ असा नाही की, तिला दुकानात आलेल्या लोकांचा अनादर करायला अधिकार दिला. खूप मोठी असल्याचा तिचा तोरा असतो. ती नेहमी दुसऱ्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करते. तिच्या मनात दुसऱ्याविषयी जराही आदर नाही. ती सारखी मला घरी पाठवत राहते. ही मस्करी नाही. ती माझ्यावर चुकीचे आरोप करत असते. तिला वाटतंय की, मी लोकांशी चुकीचे वागते. माझा असा स्वभाव नाही. मला शांती हवी आहे'.

नेमकं काय घडलं?

३९ वर्षीय जेनिफर हॅरिसने त्यादिवशी मुहम्मदला वादानंतर पुन्हा घरी पाठवलं होतं. पोलिसांच्या माहितीनुसार, वादानंतर मुहम्मद कारमध्ये गेली. त्यानंतर कारमधून चाकू घेऊन आली. त्यानंतर तिने मॅनेजरवर चाकूने १५ वेळा हल्ला केला. हल्ला करताना काही ग्राहकांनी रोखण्याचा प्रयत्न केला. एका ग्राहकाने हवेतही गोळीबार केला होता.

crime news in Marathi
Retail Inflation: आनंदाची बातमी! महागाईने गाठला 6 वर्षातील नीचांकी स्तर, काय झालं स्वस्त?

मुहम्मदने मॅनेजर हॅरिसवर हल्ला केल्यानंतर पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्राहकांनी मुहम्मदला बोलावलं. मुहम्मदच्या जीवघेण्याचा हल्ल्यात जखमी झालेल्या हॅरिसला रुग्णालयात दाखल केलं. मात्र, हॅरिसचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com