कुख्यात ड्रग्ज माफिया एल मेंचोचा खात्मा, गर्लफ्रेंडमुळे खेळ खल्लास

Girlfriend Helped Security Forces Track El Mencho: ड्रग्जचं कार्टेल चालवणारा कुख्यात ड्रग्ज माफिया एल मेंचोचा मेक्सिकोच्या सुरक्षा दलांनी खात्मा केलाय. एल मेंचो हा न्यू जनरेशन कार्टेलचा प्रमुख होता. जगातल्या सर्वात भयंकर संघटनांपैकी ही एक संस्था आहे. महत्वाचं म्हणजे त्याच्या प्रेयसीमुळेच सुरक्षा दलांना त्याच्यापर्यंत पोहचणं शक्य झालंय.
Mexican security forces eliminate notorious drug cartel leader El Mencho during a joint military operation in a forest region.
Mexican security forces eliminate notorious drug cartel leader El Mencho during a joint military operation in a forest region.Saam Tv
Published On

मेक्सिकोतील 'मोस्ट वाँटेड' कुख्यात ड्रग तस्कर एल मेंचोचा अखेर खात्मा झालाय. लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या कारवाईत एल मेंचो मारला गेलाय. एल मेंचो हा न्यू जनरेशन कार्टेलचा प्रमुख होता. जगातल्या सर्वात भयंकर संघटनांपैकी ही एक संस्था आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एल मेंचोचा सुगावा लागला तो देखील त्याच्या गर्लफ्रेंडमुळेच...मेक्सिकोत गुन्हेगारी विश्वाचं कुख्यात साम्राज्य वसवून त्यावर राज्य करणाऱ्या एल मेंचोचा शोध सुरक्षा यंत्रणा गेल्या काही वर्षांपासून घेत होत्या. तपास करताना सुरक्षा यंत्रणांना एल मेंचोच्या एका प्रेयसीबाबत समजलं. एल मेंचो त्याच्या प्रेयसीवर लक्ष ठेऊन होते. 21 फेब्रुवारीला एल मेंचोला भेटून त्याची प्रेयसी निघाली, पण मेंचो त्याच्या सुरक्षा रक्षकांसह थांबला होता. मात्र एल मेंचोचं लोकेशन मिळाताच तातडीनं लष्कर, नॅशनल गार्ड आणि हवाई दलानं संयुक्त मोहीम राबवली. दरम्यान एल मेंचो आणि त्याचे काही सहकारी जंगलाच्या दिशेनं पळाले. विशेष कृती दलातील जवानांनी या सगळ्यांचा पाठलाग केला. घनदाट जंगलात लपलेल्या एल मेंचोला त्यांनी शोधून काढलं. जंगलात दोन चकमकी उडाल्या त्यातच एल मेंचो ठार झाला.

कोण होता एल मेंचो? (हेडर)

एल मेंचो हा जगातल्या कुख्यात ड्रग्ज तस्करांपैकी एक होता. तस्करीच्या जगतात येण्यापूर्वी त्याने पोलीस अधिकारी म्हणूनही काम केलं होतं. मेक्सिकोत त्याने ड्रग्जच्या तस्करीतून त्याचं गुन्हेगारी विश्व उभं केलं होतं. फेंटानिलसह इतर ड्रग्जची तस्करी अल मेंचो करत असे. अनेक वर्षांपासून अमेरिका एल मेंचोच्या मागावर होती. एल मेंचोची माहिती देणाऱ्यावर 136 कोटींचं इनाम ठेवण्यात आलं होतं.

असं म्हणतात एल मेंचो जेव्हा छोटा होता, तेव्हा तो अफू आणि गांजाच्या शेतीत काम करायचा. पण त्याची स्वप्नं मोठी होती. अमेरिकेत गेल्यानंतर त्यानं सुरुवातीला हेरॉईनची तस्करी सुरु केली होती. काही वर्षांनी त्याला या प्रकरणात अटक झाली. अटकेनंतर त्याला तडीपार करुन मेक्सिकोत धाडण्यात आलं होतं. तिथेच त्यानं जलिस्को न्यू जनरेशन कार्टेल ही जगातील सर्वात हिंसक संघटना उभी केली. मात्र पाब्लो एस्कोबारप्रमाणे मेंचोचाही खात्मा झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com