विरोधकांना मोठा झटका; ५१ नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा, अचानक नेमकं काय घडलं?

uttar pradesh news : उत्तर प्रदेशात विरोधकांना मोठा झटका बसला आहे. दोन पक्षातील तब्बल ५१ नेत्यांनी पक्ष सोडला.
uttar pradesh
uttar pradesh news Saam tv
Published On
Summary

उत्तर प्रदेशात विरोधकांना मोठा धक्का बसलाय

बसपा आणि सपा पक्षातील नेत्यांनी साथ सोडली

51 नेत्यांनी पक्षाची साथ सोडल्याने उत्तर प्रदेशातील राजकारण ढवळून निघालंय

उत्तर प्रदेशमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उत्तर प्रदेशच्या समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षाला मोठा धक्का बसला आहे. दोन पक्षातील तब्बल ५१ नेत्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. नेत्यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षातील ५१ नेत्यांनी ओमप्रकाश राजभर यांच्या सुहेलदेव भारतीय समाज पक्षात प्रवेश केला आहे. ५१ नेत्यांनी प्रवेश केल्यानंतर ओमप्रकाश राजभर यांनी अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला.

uttar pradesh
धक्कादायक! बँकेला मृत्यूचा पुरावा हवा होता, भाऊ चक्क बहि‍णीचा सांगाडाच घेऊन आला, नेमकं झालं काय?

ओमप्रकाश राजभर यांनी म्हटलं की, 'अखिलेश यांनी 'पीडीए'संदर्भात घोषणाबाजी केली, तरी त्यांचं सरकार उत्तर प्रदेशमध्ये येणार नाही. अखिलेश यांच्याकडे कोणतंही खातेवही नाही. ना त्यांच्याकडे कोणताही हिशोब नाही, अशी टीका राजभर यांनी अखिलेश यादव यांच्यावर केली. भारतातील मुस्लिम हे काही वर्षांपूर्वी हिंदू होते. त्यांना बळजबरी आणि आमिष देऊन धर्मांतर करण्यास भाग पाडलं.

बसपामधून कुणी कुणी प्रवेश केला?

बसपाच्या प्रदीप सिंह, अर्जुन प्रताप सिंह, संजीव सिंह बंटू, संजीव सिंह, बब्बन सिंह, दीपक सिंह, रोशन सिंह, अवनीश दूबे चंदन, कौशलेंद्र प्रताप सिंह, मनोज सिंह, शशी प्रकाश राय, वैभव राय, विवेक सिंह, रितिक राय, सुमीत पांडे, शुभम राय, सतीश दूबे, शिवम सिंह, राणा प्रताप सिंह, फरीद अहमद, रवींद्र राजभर, विवेक सिंह, अमन कांत सिंह, संतोष भारती, जितेंद्र सिंह, अविनाश सिंह, नीरज दुबे, आकाश मिरा, गोलू यादव, सूरज कुमार, सचिन कुमार, अंशु सिंह, मिथलेश यादव, निरंजन राजभर, अमन पटेल

uttar pradesh
भाजपमध्ये प्रवेश केलेले 7 खासदार अपात्र ठरणार का? कायदा काय सांगतो? तज्ञ म्हणाले...

सपामधून कुणी कुणी प्रवेश केला?

अतुल सिंह, रोशन सिंह, अभिषेक सिंह, सुबोध कनौजिया, विशाल पांडे, पियुष सिंह, अर्पित सिंह, रणविजय सिंह, राकेश सिंह, बजरंग सिंह, शिवम सिंह, अजय कुमार, प्रवीण सिंह आणि संतोष यादव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com