Operation Sindoor : भारताने मध्यरात्री पाकिस्तानची झोप उडवली; मौलानांकडून मोठी घोषणा, म्हणाले, 'आता मुस्लीम...'

Operation Sindoor updates : भारताने मध्यरात्री एअर स्ट्राइक करत पाकिस्तानची झोप उडवली आहे. भारताच्या एअर स्ट्राइकनंतर मौलानांनी मोठी घोषणा केली आहे.
Operation Sindoor update
Operation SindoorSaam tv
Published On

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. भारताने मध्यरात्री ९ ठिकाणी एअर स्ट्राईक करत पाकिस्तानची झोप उडवली. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांची हत्या केल्यानंतर भारतीयांमध्ये संतापाची लाट उसळली होती. दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर काही दिवसातच भारतीय सैन्याने बदला घेतला आहे. भारतीय सैन्य दलाने केलेल्या एअर स्ट्राइकला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राइक केल्यानंतर 'जमीयत उलमा-ए-हिंद'ने प्रतिक्रिया दिली. 'आम्ही भारत देश आणि सैन्य दलाच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत, असं भाष्य 'जमीयत उलमा-ए-हिंद'चे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी यांनी केलं आहे.

Operation Sindoor update
Dombivli Crime : भाजपमध्ये जोरदार राडा; माजी नगरसेवकाच्या समर्थकांमध्ये तुफान हाणामारी, डोकी फोडली

भारतीय सैन्य दलाच्या एअर स्ट्राइकचं देशभरातून कौतुक होत आहे. 'जमीयत उलमा-ए-हिंद'चे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी यांनी भारतीय सैन्य दलाच्या एअर स्ट्राइकवर प्रतिक्रिया दिली. मौलाना महमूद मदनी यांनी म्हटलं की, 'जमीयत उलमा-ए-हिंद- देशाचं सार्वभौमत्व, अखंडता आणि सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड होणार नाही. पाकिस्तानकडून युद्ध लादण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर भारतातील सर्व धर्मीय लोक विशेष म्हणजे भारतीय मुस्लीम बांधव सैन्य दलाच्या पाठिशी उभे राहतील'.

Operation Sindoor update
Maharashra Politics : काँग्रेसला फोडा अन् रिकामी करा; महायुती सरकारच्या बड्या मंत्र्यांचा भाजप पदाधिकाऱ्यांना कानमंत्र

मौलाना मदनी यांनी पुढे स्पष्ट केलं की, 'भारत आमचा देश आहे. त्याची रक्षा करणे आमची राष्ट्रीय आणि संविधानिक जबाबदारी आहे. जमीयत उलमा-ए-हिंद संघटना नेहमी देशभक्ती, शांती आणि एकतेचा संदेश देत आली आहे. आमच्या सीमेवर संकंट आलंय आहे. त्यामुळे आम्ही सैन्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे राहण्याचे वचन देतो. माझा संदेश भारतातील सर्व नागरिक आणि विशेष म्हणजे मुस्लीम बांधवांसाठी आहे. आम्ही सर्व एकजुटीने देशाच्या रक्षणासाठी उभे आहोत'.

Operation Sindoor update
Beed Crime : बीड हादरलं! बापाने केली पोटच्या मुलाची हत्या, धक्कादायक कारण आलं समोर

मौलाना मदनी यांनी पुढे म्हटलं की, 'आम्ही लोकांमध्ये एकता, संयम आणि बलिदानाची भावना वाढवू. भारत सरकारने शत्रूच्या प्रत्येक आक्रमक कृत्यीला चोख उत्तर दिलं पाहिजे. शत्रू राष्ट्राला स्पष्ट संदेश दिला पाहिजे की, आम्ही भारताच्या एकजुटीचं कोणत्याही परिस्थितीत रक्षण करू. भारत देश कोणतंही आक्रमण सहन करणार नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com