बंदरात उभ्या असलेल्या 623 फुट भल्या मोठ्या जहाजाला भीषण आग; 20 जणांचा मृत्यू

Qingdao China Foreign Flagged Cargo Ship Fire: चीनमधील किंगदाओ येथील बेहाई शिपयार्डमध्ये देखभालीसाठी उभ्या असलेल्या विदेशी मालवाहू जहाजाला भीषण आग लागली.
China shipyard fire foreign cargo ship casualties
China shipyard fire foreign cargo ship casualtiessaam tv
Published On

पूर्व चीनमधील शेडोंगमध्ये किंगदाओ येथील बेहाई शिपयार्डमध्ये देखभालीसाठी उभ्या असलेल्या एका विदेशी ध्वजाच्या मालवाहू जहाजाला गुरुवारी सकाळी भीषण आग लागली. या दुर्घटनेत मोठी जीवितहानी आणि मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, मृतांचा नेमका आकडा 20 सांगितला जात असून आगीचे कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेले नाही.

China shipyard fire foreign cargo ship casualties
Pune : भीषण स्फोटाने खळबळ! पिंपरी-चिंचवड शहराचा वीजपुरवठा खंडित; पाहा नक्की काय घडलं

किंगदाओ येथील ‘बेहाई शिपबिल्डिंग कंपनी लिमिटेड’च्या बंदरात देखभालीसाठी हे विदेशी मालवाहू जहाज उभे होते. गुरुवारी सकाळी सुमारे 11 वाजून 15 मिनिटांनी (भारतीय वेळेनुसार सकाळी 8.45 वाजता) जहाजाला अचानक भीषण आग लागली. आग लागल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.

China shipyard fire foreign cargo ship casualties
स्वातंत्र्यदिनी भीषण अपघात! ट्रॅव्हल्सच्या धडकेत ३ शाळकरी मुलींचा शाळेबाहेर मृत्यू; महाराष्ट्रावर शोककळा

चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, सध्या मृत आणि जखमींची अचूक संख्या अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. तसेच आग पूर्णपणे नियंत्रणात आली आहे की नाही, हेही स्पष्ट झालेले नाही.

शी जिनपिंग आणि ली कियांग यांचे बचावकार्याचे निर्देश

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या दुर्घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी संबंधित विभागांना तातडीने शोध आणि बचावकार्य राबवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच दुर्घटनेतून गंभीर धडा घेत भविष्यातील आगीच्या घटना टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या अग्निसुरक्षा धोक्यांची सखोल तपासणी करून त्यावर उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनीही दुर्घटनेत अडकलेल्या आणि बेपत्ता असलेल्या व्यक्तींचा तातडीने शोध घेण्याचे निर्देश दिले. जखमींना योग्य वैद्यकीय उपचार मिळतील, अशी ग्वाही देत कोणत्याही प्रकारच्या अशा दुर्घटना किंवा अतिरिक्त आपत्ती होऊ नयेत, यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com