Pune : भीषण स्फोटाने खळबळ! पिंपरी-चिंचवड शहराचा वीजपुरवठा खंडित; पाहा नक्की काय घडलं

Pimpri Chinchwad power outage : चिंचवडमधील महापारेषणच्या मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोट झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून वीज कधी पूर्ववत होणार, जाणून घ्या.
Pimpri Chinchwad power outage
Pimpri Chinchwad power outage
Published On

गोपाल मोटघरे, साम टीव्ही प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील वीजपुरवठ्यासंदर्भात एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. चिंचवड येथील 'महापारेषण'च्या मुख्य वीज उपकेंद्रात रविवारी अचानक भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटाच्या मोठ्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दुर्घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील अनेक महत्त्वाच्या भागांचा वीजपुरवठा तात्काळ खंडित करण्यात आला आहे.

नेमकी कशी घडली दुर्घटना?

प्राथमिक माहितीनुसार, चिंचवड येथील महापारेषणच्या मुख्य उपकेंद्रात नेहमीप्रमाणे काम सुरू असताना अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे वीज यंत्रणेत प्रचंड तांत्रिक बिघाड निर्माण झाला. पुढील मोठा धोका किंवा इतर अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून मुख्य वीजवाहिन्यांचा पुरवठा तातडीने बंद केला आहे.

Pimpri Chinchwad power outage
जमीन खरेदी-विक्रीचा नवा नियम, आता गुंठ्यांत जमीन घेण्यापूर्वी हे वाचाच, अन्यथा व्यवहार ठरेल बेकायदेशीर

दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू!

घटनेची माहिती मिळताच महापारेषण आणि महावितरणची वरिष्ठ अधिकारी तसेच तांत्रिक पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. उपकेंद्रातील बिघाड दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

Pimpri Chinchwad power outage
Society Rules : घराबाहेर, लिफ्टसमोर चपलांचा रॅक ठेवणे पडेल महाग! सोसायट्यांचा कडक नियम; पाहा काय सांगतो कायदा!

वीज कधी पूर्ववत होणार?

या अचानक उद्भवलेल्या संकटामुळे शहरातील नागरिकांना मात्र मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार, यंत्रणेतील बिघाड मोठा असल्याने काम पूर्ण होण्यास काही वेळ लागण्याची शक्यता आहे. वीजपुरवठा नक्की कधी पूर्ववत होईल, याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत वेळ किंवा माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. नागरिकांनी शांतता बाळगावी आणि सहकार्य करावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com