Mahakumbh Fire : महाकुंभमेळ्यात अग्नितांडव; अनेक तंबू जळून खाक, शेकडो लोक अडकले, VIDEO

Mahakumbh Fire News : महाकुंभमेळ्यात अग्नितांडव पाहायला मिळत आहे. या आगीमुळे अनेक तंबू जळून खाक झाले आहेत. या आगीत शेकडो लोक अडकल्याचे पाहायला मिळत आहे. या घटनेनंतर एकच धावाधाव पाहायला मिळत आहे.
Mahakumbh mela  news
Mahakumbh mela Saam tv
Published On

प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात भीषण आगीची घटना घडली आहे. महाकुंभमेळ्यातील शास्त्री पूल सेक्टर १९ कॅम्पमध्ये ही भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. जेवण तयार करताना सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगीमुळे अनेक तंबू जळून खाक झाले आहेत. या आगीत शेकडो लोक अडकले आहेत. या लोकांना वाचवण्यासाठी अग्निशशन दल, सीआरपीएफ आणि एनडीआरएफचे दल घटनास्थळी पोहोचलं आहे.

महाकुंभमेळ्यात आग लागल्यानंतर एकच गोंधळ उडाला आहे. आग लागल्यानंतर पुलावरील वाहतूक रोखण्यात आली आहे. ही आग झपाट्याने पसरली. या आगीचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आलेली नाही. महाकुंभमेळ्यातील अखिल भारतीय धर्म संघ श्रीकरपात्री धाम वाराणसी शिबीरात ही आग लागली आहे. तंबूतील सिलिंडरला देखील आग लागल्याची घटना घडली आहे. एकामागून एक सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीची भीषण दुर्घटना घडली. गीता प्रेस देखील आगीच्या विळख्यात सापडली.

Mahakumbh mela  news
MahaKumbh: मी साध्वी नाहीये, सोशल मीडियावर व्हायरल झालेली हर्षा रिछारिया असं का म्हणाली?

आग लागल्यानंतर दोन मिनिटांत अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. दहा मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतरही आग विझविण्यात यश आलं नाही. काही क्षणार्धात अनेक तंबू जळू लागले. ही संपूर्ण आग १०० मीटर परिसरात पसरली. महाकुंभमेळ्यातील ही आग ३० फूट उंच उसळल्याचंही पाहायला मिळालं. या आगीची माहिती मिळताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील पाहणी करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले.

Mahakumbh mela  news
Mahakumbh cylinder explosion: महाकुंभमेळ्यात आगीने घेतला रुद्रावतार; भाविकांची धावाधाव, आगीचे धडकी भरवणारे फोटो

२५ तंबू जळून खाक

महाकुंभमेळ्यात आग लागल्यानंतर २५ हून अधिक तंबू जळून खाक झाले. ही आग मेन रोडच्या पूलाजवळ ही आग लागली आहे. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या १९ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. वेगवान वाऱ्यामुळे तिपट्टीने आगीने पेट धरला. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान तातडीने मैदानात उतरले. आग लागल्यानंतर पुलावरून जाणाऱ्या रेल्वे देखील थांबवण्यात आल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com