जबलपूरमधील रुग्णालयाला भीषण आग; ८ जणांचा मृत्यू

मध्य प्रदेशमधील जबलपूर जिल्ह्यातील खासगी न्यू लाईफ स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भीषण आग लागली.
Jabalpur News
Jabalpur NewsSaam Tv
Published On: 

भोपाळ: मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) जबलपूर जिल्ह्यातील खासगी न्यू लाईफ स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भीषण आग लागली आहे. या आगीत ८ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात सुमारे ६ रुग्ण भाजल्याची माहिती आहे. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. आगीमुळे रुग्णालय (hospital) परिसरात घबराटीचे वातावरण आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जबलपूर रुग्णालयात आगीच्या घटनेत प्राण गमावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली.

Jabalpur News
मोठी बातमी! संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या; ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

या रुग्णालयाबाबत (hospital) अजुनही माहिती समोर आलेली नाही. या रुग्णालयाची माहिती घेण्याचे काम सध्या प्रशासन करत आहे. नागरिकांनी अचानक धावपळ सुरू केल्यानंतर रुग्मालयाला आग लागल्याची माहिती समोर आली. यावेळी लोकांचा आरडाओरड सुरू होता. तात्काळ घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आग इतकी भीषण होती की अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत आग सर्वत्र पसरली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.