Jagannath Rath Yatra : जगन्नाथ रथयात्रेत तुफान गर्दी उसळली; गुदमरून एका भाविकाचा मृत्यू; १२० हून अधिक भाविक रुग्णालयात

Jagannath Rath Yatra : पुरीमध्ये भगवान जगन्नाथ रथयात्रेत तुफान गर्दी लोटली. एका भाविकाचा गुदमरून मृत्यू झाला. तर १२० हून अधिक भाविकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जगन्नाथ रथयात्रेत गर्दीमुळे श्वास कोंडून भाविकाचा मृत्यू, १२० भाविक रुग्णालयात
Jagannath Rath Yatra Puri Odishasocial media
Published On

ओडिशाच्या पुरीमध्ये आयोजित जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ रथयात्रेत गुरुवारी चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती ओढवल्यानं मोठी दुर्घटना घडली. भगवान जगन्नाथाच्या दर्शनासाठी झालेल्या अलोट गर्दीमुळं बराच वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. यात गुदमरून एका भाविकाचा मृत्यू झाला. तर १२० हून अधिक भाविकांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना पुरीच्या जिल्हा मुख्यालयाच्या रुग्णालयासह इतर वैद्यकीय केंद्रांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेनंतर तात्काळ मदत आणि बचावकार्य सुरू केले असून, परिस्थिती नियंत्रणात आणली.

मंदिर परिसर आणि ग्रँड रोडवर गुरुवारी सकाळी लाखो भाविकांची गर्दी उसळली. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा यांची पारंपरिक 'पहाडी' सोहळ्यावेळी भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी झाली. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे अनेक भाविकांचा श्वास कोंडला. अनेक जण बेशुद्ध पडले.

लाखो भाविकांची उसळलेली गर्दी आणि त्यात उष्णता त्यामुळं भाविकांना अस्वस्थ वाटू लागले. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, अनेक भाविकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. श्वास कोंडल्यामुळे, तसेच डीहायड्रेशनचा त्यांना त्रास झाला. अनेक भाविकांना प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. तर प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही भाविकांवर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक आणि वैद्यकीय पथके तात्काळ पोहोचले. प्रशासनाने आधीपासूनच व्यवस्था केलेल्या पर्यायी मार्गाने भाविकांना गर्दीतून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. रुग्णवाहिकांमधून त्यांना रुग्णालयात पोहोचवले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, तात्काळ बचावकार्य सुरू केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

या दुर्घटनेनंतर पुरी प्रशासनाने रथयात्रेच्या मार्गावरील सुरक्षा व्यवस्था कडेकोट केली आहे. मंदिर परिसर आणि आजूबाजूच्या परिसरात अतिरिक्त पोलीस दल, ओडीआरएएफ, एनडीआरएफ, अग्निशमन दलाचे कर्मचारी, वैद्यकीय पथके तैनात आहेत. ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून भाविकांना विविध सूचना करण्यात येत आहेत. निश्चित मार्गांचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी संयम बाळगा, तसेच सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

जगन्नाथ रथयात्रेत गर्दीमुळे श्वास कोंडून भाविकाचा मृत्यू, १२० भाविक रुग्णालयात
Viral Video : आकाशातून थेट रस्त्यावर आपटला पॅराग्लाइडिंग पायलट; लँडिंगवेळचा थरारक व्हिडिओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com