Rahul Gandhi In Manipur : मणिपूर हिंसाचारावर राहुल गांधींना चिंता; म्हणाले, शांतता प्रस्थापित करण्यासाठी आलोय

Rahul Gandhi Visit Manipur Relief Camps : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपूरला भेट दिली. दुसऱ्या दिवशी मोइरांगमधील अनेक आश्रय शिबिरांमधील नागरिकांची विचारपूस केली.
Rahul Gandhi Visit Manipur Relief Camps
Rahul Gandhi Visit Manipur Relief Camps SAAM TV
Published On

Rahul Gandhi Visit Manipur Relief Camps : मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप तणावपूर्ण स्थिती आहे. राज्यात हिंसाग्रस्त भागातील नागरिकांना मदत आणि आश्रय शिबिरांमध्ये ठेवण्यात येत आहे. त्याचवेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपूरला भेट दिली. दुसऱ्या दिवशी मोइरांगमधील अनेक आश्रय शिबिरांना त्यांनी भेट दिली. तेथील पीडित नागरिकांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी राज्यातील हिंसाचाराच्या घटनांवर चिंता व्यक्त केली.

Rahul Gandhi Visit Manipur Relief Camps
PM Modi Plan for 2024 Elections : लोकसभा निवडणुकीआधी PM मोदी अॅक्शन मोडमध्ये; मंत्र्यांना दिला 'कानमंत्र'

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शुक्रवारी मणिपूरच्या राज्यपालांची भेट घेतली. राज्यातील परिस्थितीवर त्यांनी चिंता व्यक्त केली. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राज्यात शांततेची आवश्यकता आहे. मी या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याच्या हेतूने आलो आहे. राज्यात या घडीला शांततेची गरज आहे. हिंसेने काहीही होणार नाही, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली. यावेळी गांधी यांनी येथील आश्रय आणि मदत शिबिरांना भेट दिली. शिबिरांमध्ये सुधारणांची गरज आहे. जेवण आणि औषधपाण्याची अबाळ आहे. सरकारला याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.

Rahul Gandhi Visit Manipur Relief Camps
PM Modi Travel In Delhi Metro: अरे हे तर पीएम मोदी आहेत! सकाळी सकाळी दिल्लीकरांना सरप्राईज, पंतप्रधानांचा दिल्ली मेट्रोतून प्रवास

मदत शिबिरांना भेटी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज, शुक्रवारी मोइरांग शहरात आश्रय आणि मदत शिबिरांना भेटी दिल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कीशम मेघचंद्र यांनी राहुल गांधींच्या दौऱ्याबद्दल माहिती दिली होती.

राहुल गांधींचा मणिपूर दौरा

राहुल गांधी काल गुरुवारी मणिपूरमध्ये पोहोचले. चुराचांदपूर येथील मदत शिबिरांना भेटी देऊन तेथील नागरिकांची विचारपूस केली होती. हा भाग गेल्या दोन महिन्यांपासून अशांत आहे.

हिंसाचारग्रस्त चुराचांदपूर परिसरातील मदत शिबिरांना भेट देण्यासाठी गेलेल्या राहुल यांना काल अर्ध्या रस्त्यातच अडवण्यात आले होते. स्थानिक पोलिसांनी त्यांचा ताफा रोखून धरला होता. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध नोंदवला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com