मणिपूरमध्ये ५.२ रिश्टरचा भूकंप झाला
भूकंपाचा केंद्रबिंदू कामजोंग परिसरात होता
कोणतीही जीवितहानी झालेली नाही
प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले
Manipur Earthquake News मणिपूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. आज सकाळच्या सुमारास भूकंपाच्या धक्क्याने ईशान्य भारतातील मणिपूर हादरलं आहे. पहाटे झालेल्या या भूकंपामुळे नागरिक भयभीत झाले. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की, गाढ झोपेत असलेले लोक अचानक जागे झाले आणि जीव वाचवण्यासाठी घराबाहेर रस्त्यावर धावले. या भूकंपाची तीव्रता ५.२ रिश्टर इतकी होती. दरम्यान नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच या भूकंपामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, आज म्हणजेच मंगळवारी सकाळी मणिपूरमध्ये मोठा भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.२ होती. भूकंपाची तीव्रता जास्त असल्यामुळे त्याचे धक्के जोरदारपणे जाणवले. हा भूकंप भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ५:५९ वाजता झाला.
या भूकंपाचा केंद्रबिंदू मणिपूरमधील कामजोंग परिसर होता. हा भूकंप जमिनीच्या पृष्ठभागाखाली सुमारे ६२ किलोमीटर खोलीवर झाला. दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याचे वृत्त नाही. मणिपूर प्रशासन सध्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
महिन्याच्या सुरुवातीला उत्तर भारतातील अनेक भागांना तीव्र भूकंपाचा धक्का बसला होता. ३ एप्रिल रोजी, रात्री सुमारे ९:४६ वाजता, दिल्ली-एनसीआर, पंजाब आणि हरियाणा येथे भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमध्ये होता.अफगाणिस्तानमध्ये झालेला भूकंप १८० किलोमीटरपेक्षा जास्त खोलीवर होता, ज्यामुळे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या मोठ्या भागांवर परिणाम झाला. या मध्ये आठ जणांचा मृत्यू झाला. पाकिस्तानच्या हवामान विभागाच्या माहितीनुसार, इस्लामाबाद, पेशावर, चित्राल, स्वात आणि शांगला यांसारख्या भागांमध्येही मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.