Shocking : डोक्यावर हातोड्याने वार करत बायकोची हत्या, दुसऱ्या दिवशी आढळला झाडाला लटकलेला नवऱ्याचा मृतदेह

Shocking News : डोक्यावर हातोड्याने वार करुन आरोपीने त्याच्या बायकोला संपवले, त्यानंतर तो पळून गेला. दुसऱ्या दिवशी जंगलात एका झाडाला त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
Shocking
Shockingx
Published On
Summary
  • नवऱ्याने हुंड्यापायी बायकोला संपवलं

  • नंतर नवऱ्याचाही संशयास्पद मृत्यू

  • घटनेमुळे गावात मोठी खळबळ

Crime : एका व्यक्तीने त्याच्या बायकोची निर्घुणपणे हत्या केली. डोक्यावर हातोड्याने वार करून आरोपीने त्याच्या बायकोचा जीव घेतला. घटनेच्या दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह जंगलात एका झाडाला लटकलेला आढळला. या धक्कादायक घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि तपासाला सुरुवात केली. ही घटना उत्तरप्रदेशच्या लालताखेडा गावाबाहेर घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यातील गंगाघाट पोलीस स्टेशन परिसरात येणाऱ्या लालताखेडा गावाबाहेर ही थरारक घटना घडली. काल १५ ऑक्टोबर रोजी ३२ वर्षीय राजेशने त्याची २८ वर्षीय बायको, सीमाची हत्या केली. तिच्या डोक्यावर हातोड्याने वार केला. बायकोची हत्या केल्यानंतर राजेशने घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली आणि तो पळून गेला.

Shocking
Gold Rate : सोन्याच्या दरात होणार विक्रमी घट! कधी विकत घ्यायचं सोनं; वाचा तज्ज्ञ काय म्हणतायत?

दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज १६ ऑक्टोबर रोजी राजेशचा मृतदेह जंगलात एका झाडाला लटकलेला आढळून आला. पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. राजेश आणि सीमा यांना दोन लहान मुलं आहेत. या घटनांमुळे दोन्ही मुलं अनाथ झाली आहेत. राजेशने सीमाची हत्या का केली याचा पोलीस तपास करत आहेत.

Shocking
Accident : हिट अँड रनचा थरार! भरधाव कारने बहिणींना चिरडले; थोरलीचा मृत्यू, धाकटी गंभीर जखमी

पोलिसांच्या तपासानुसार, राजेशने सीमाची हत्या केल्यानंतर तिचे कुटुंबीय आणि ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. सीमाची हत्या हुंड्यापायी झाल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. यादरम्यान राजेशचा शोध घेत असताना पोलिसांनी त्याच्यासह सासरच्या सहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. राजेशच्या कुटुंबीयांना पोलिसांनी अटक केली. राजेशचा शोध सुरु असताना त्याचा मृतदेह एका झाडाला लटकताना दिसला. ही हत्या हुंड्यामुळे नाहीतर इतर कारणाने झाल्याचे काहीजण म्हणत आहेत. या दोन्ही घटनांमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Shocking
Yuvraj Singh : वडिलांना साधा कुर्ता घेत नाही पण 'त्या' बाबाला १५ लाखांचं घड्याळ देतो, युवराज सिंगवर गंभीर आरोप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com