Shocking News: सातही दिवस २४ तास काम, ड्युटी अवर्समध्ये गर्लफ्रेंडसोबत सेक्स करताना मृत्यू

Man Dies During physical With Girlfriend: गर्लफ्रेंडसोबत सेक्स करताना ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ड्युटी अवर्समध्येच ही घटना घडली. याप्रकरणी कोर्टाने इंडस्ट्रीयल अपघात असल्याचे सांगत कारखान्याला नुकसानभरपाई देण्याचा निर्णय दिला आहे.
Shocking News: सातही दिवस २४ तास काम, ड्युटी अवर्समध्ये गर्लफ्रेंडसोबत सेक्स करताना मृत्यू
Shocking NewsSaam Tv
Published On

ड्युटी अवर्समध्ये गर्लफ्रेंडसोबत सेक्स करताना एका ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर कोर्टाने जो निर्णय दिला त्याचीच जगभरामध्ये चर्चा होत आहे. हा इंडस्ट्रीयल अपघात असल्याचा निर्णय कोर्टाने दिला. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना कारखान्याकडून नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार असल्याचे कोर्टाने यावेळी सांगितले. कोर्टाच्या या निर्णयाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना चीनमध्ये घडली आहे. गर्लफ्रेंडसोबत सेक्स करताना मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव झांग असं होतं. झांग ६० वर्षांचा होता. तो बीजिंगमधील एका कारखान्यात सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होता. कारखान्याच्या सुरक्षेची सर्व जबाबदारी त्याच्यावरच होती. महत्वाचे म्हणजे झांग सातही दिवस २४ तास काम करत होता. त्याला एकही दिवस सुट्टी मिळत नव्हती. सतत इतके तास काम करून झांग वैतागला होता. पण कुटुंबाच्या जबाबदारीमुळे त्याला नोकरी सोडता येत नव्हती.

Shocking News: सातही दिवस २४ तास काम, ड्युटी अवर्समध्ये गर्लफ्रेंडसोबत सेक्स करताना मृत्यू
Pune Crime : ब्रेकअपनंतर बॉयफ्रेंड पाठ सोडेना, IT तील गर्लफ्रेंडला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी

२४ तास काम आणि सुट्टी मिळत नसल्यामुळे झांगची गर्लफ्रेंड त्याला कामाच्या ठिकाणीच भेटायला यायची. सुरक्षा कक्षात दोघे जण भेटायचे. या भेटीदरम्यान झांग आणि त्याच्या गर्लफ्रेंडने शरीरसंबंध ठेवले. याचदरम्यान अनर्थ घडला आणि झांगचा मृत्यू झाला. पोलिस तपासादरम्यान झांगचा मृत्यू घातपात नसून नैसर्गिक असल्याची माहिती समोर आली. वडिलांच्या मृत्यूमुळे झांगच्या मुलाला मोठा धक्का बसला.

Shocking News: सातही दिवस २४ तास काम, ड्युटी अवर्समध्ये गर्लफ्रेंडसोबत सेक्स करताना मृत्यू
Dhule Crime : शेतमजुरीच्या वादातून भयानक कृत्य; धुळ्यातील हत्येचा उलगडा, चार आरोपी ताब्यात

वडिलांच्या मृत्यूनंतर झांगच्या मुलाने कोर्टात धाव घेतली. त्याने म्युनिसिपल सोशल सिक्युरिटी ब्युरोच्या कायदेशीर विभागामार्फत इंडस्ट्रीयल अपघाताअंतर्गत वडिलांचा मृत्यू झाला त्यामुळे मोबदला म्हणून भरपाई मिळावी यासाठी दावा केला. त्याने असा देखील दावा केला की, वडिलांचा मृत्यू कामाच्या ठिकाणी झाला त्यामुळे आम्ही नुकसानभरपाईसाठी पात्र आहोत.

पण झांगचा मृत्यू खासगी प्रकरणादरम्यान झाला होता त्यामुळे त्याचा कामाशी काहीही संबंध नव्हता असे म्हणत अधिकाऱ्यांनी सुरूवातीला हा दावा फेटाळून लावला. पण झांगच्या मुलाने हे प्रकरण लावून धरले. त्याने कारखाना आणि सामाजिक सुरक्षा प्राधिकरणाविरोधात केस दाखल केली. माझे वडील २४ तास काम करत होते. त्यामुळे खासगी प्रकरणादरम्यान त्यांचा मृत्यू झाला म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नका असा दावा त्याने केला.

Shocking News: सातही दिवस २४ तास काम, ड्युटी अवर्समध्ये गर्लफ्रेंडसोबत सेक्स करताना मृत्यू
Pune Crime : फोन करुन मैदानात बोलावलं, आर्थिक कारणावरुन जोरदार भांडण; पुण्यात दगड टाकून हत्या

अखेर झांगच्या मुलाच्या बाजूने निकाल लागला. बरीच वर्षे या प्रकरणावर सुनावणी सुरू होती. कोर्टाने सांगितले की, झांग यांचा मृत्यू कामाच्या ठिकाणी झाला. त्यांच्यावर सुरक्षा आणि काम अवलंबून होते त्यामुळे ते नोकरी सोडू शकत नव्हते. त्यामुळे हा मृत्यू त्यांच्या कामाशी संबंधित आहे. झांग २४ तास काम करत होते त्यामुळे त्यांना वैयक्तिक कामं हे कामाच्या वेळेतच करावी लागत होती. अशातच झांग यांचा मृत्यू इंडस्ट्रीयल अपघात असल्याचे म्हटले. कोर्टाने झांग यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरापाई देण्याचे आदेश कारखान्याला दिले. सध्या चीनसह संपूर्ण जगभरात या प्रकरणाची जोरदार चर्चा होत आहे.

Shocking News: सातही दिवस २४ तास काम, ड्युटी अवर्समध्ये गर्लफ्रेंडसोबत सेक्स करताना मृत्यू
Crime News : परळी हादरली! गर्लफ्रेंड नर्सला कोयत्याने संपवले, अन् तिथेच बॉयफ्रेंडने गळफास घेतला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com