Crime News : परळी हादरली! गर्लफ्रेंड नर्सला कोयत्याने संपवले, अन् तिथेच बॉयफ्रेंडने गळफास घेतला

Parli, Raigad crime News : रायगडच्या परळी गावात थरकाप उडवणारी घटना घडली आहे. प्रियकराने नर्स गर्लफ्रेंडचा कोयत्याने खून करून आत्महत्या केली. सुधागड तालुका हादरला असून, पोलीस तपास सुरू आहे.
Boyfriend Kills Nurse Girlfriend
Boyfriend Kills Nurse GirlfriendSaam TV News
Published On

सचिन कदम, रायगड प्रतिनिधी

Boyfriend Kills Nurse Girlfriend : कोयत्याने सपासप वार करत गर्लफ्रेंडची हत्या केली. त्यानंतर रक्ताने माखलेल्या अंगाने बॉयफ्रेंडने गळफास घेत आयुष्य संपवले. या धक्कादायक घटनेने रायगड जिल्हा हादरलाय. शेखर दुधाणे आणि पौर्णिमा अशी मृताची नावे आहेत. सुधारगड तालुक्यातील परळीत ही थरकाप उडवणारी घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवलाय. पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी चौकशीला सुरूवात केली आहे. पोलिसांनी कोयता आणि इतर साहित्य जप्त केलेय. शेखर याने गर्लफ्रेंडची हत्या का केली? त्याने टोकाचे पाऊल का उचलले? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

प्रियकराने प्रेयसीचा कोयत्याने खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याने रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुका सुन्न झाला आहे. या घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिस तपास सुरू आहे. प्रियकर शेखर दुधाणे आणि त्याची प्रेयसी पौर्णिमा यांच्यातील नातेसंबंध गावात सर्वश्रुत होते. पौर्णिमा परळी येथील एका खासगी नर्सिंग होममध्ये नर्स म्हणून कार्यरत होती. मंगळवारी रात्री शेखर नर्सिंग होममध्ये पोहोचला आणि पौर्णिमावर कोयत्याने अनेक वार करून निर्घृण खून केला. यानंतर, त्याने तिथेच गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली.

Boyfriend Kills Nurse Girlfriend
Gaja Marne : गुंड गजा मारणेची मटण पार्टी भोवली, पुण्यातील एका अधिकाऱ्यासह ४ पोलिसांचे निलंबन

या घटनेने सुधागड तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेखरने असे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. पाली पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले आहेत. पोलिसांनी तपास सुरू केला असून, शेखर आणि पौर्णिमा यांच्या नातेसंबंधांचा तपशील तपासला जात आहे. ही घटना परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.

Boyfriend Kills Nurse Girlfriend
Pune : भयावह! भरचौकात १८ वर्षाच्या तरूणीची हत्या, दुचाकीवर आले अन् सपासप वार केले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com