

पंजाबमध्ये दुहेरी हत्याकांडाची घटना
तरुणाने मेहुण्याला जिवंत जाळलं
या घटनेत तरुणाच्या वहिणीचाही मृत्यू झाला
या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे
पंजाबमध्ये हत्याकांडाची भयंकर घटना घडली. भांडणानंतर माहेरी निघून गेलेल्या बायकोला आणायला गेलेल्या तरुणाची हत्या करण्यात आली. या तरुणावर त्याच्या मेहुण्याने पेट्रोल टाकूने पेटवून दिलं. या घटनेत तरुणाचा होरपळून जागीच मृत्यू झाला. तर त्याला वाचवायला गेलेली वहिनी देखील या घटनेत गंभीर जखमी झाली होती. तिचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. ही घटना १३ जून रोजी घडली होती. पण या घटनेचा व्हिडीओ आता समोर आल्याने ती चर्चेत आली आहे.
पोलिसांनी सांगितले की, ही घटना तरनतारन जिल्ह्यातील संघा गावात घडली. मृत लवप्रीत सिंग हा त्याची पत्नी संदीप कौरला आपल्यासोबत राहण्यासाठी मनवण्यासाठी सासरच्या घरी गेला होता. नवरा- बायकोमध्ये भांडण झाले होते. त्यानंतर त्याची बायको माहेरी निघून गेली होती. जेव्हा लवप्रीत आपल्या बायकोची समजूत काढण्यासाठी सासरच्या घरी गेला त्यावेळी त्याचा मेहुणा साजन सिंगने त्याच्यावर पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिले. त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
लवप्रीत सिंगची वहिनी गुरजीत त्याला वाचवण्यासाठी मध्ये गेली या आगीत ती देखील गंभीररित्या भाजली. नंतर तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण नंतर उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला. या घटनेत आरोपीही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. या प्रकरणी तरनतारन येथील पोलिस ठाण्यात साजन सिंगविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास सुरू आहे.
या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती दुचाकीजवळ उभा आहे. त्याचवेळी त्याठिकाणी दुसरी व्यक्ती येते. तो दुचाकीजवळ उभ्या असलेल्या व्यक्तीच्या अंगावर बाटलीतील ज्वलनशील पदार्थ टाकतो. त्यानंतर लगेच आग लावण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी एक महिला त्याला रोखण्याचा प्रयत्न करते. पण हा तरुण आग लावून टाकतो आणि भडका उडतो. या घटनेत दुचाकीजवळील तरुणी जिवंत जळत असल्याचे दिसते. तर आरोपी आणि महिला हे दोघे देखील या आगीत जखमी होत असल्याचे दिसत आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.