पृथ्वीवरून अनेक प्रजाती नामशेष झाल्याचं तर अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचं आपण ऐकला असेल. पण पृथ्वीवरून मानवचं नष्ट झाला तर, हे ऐकायला पण थोडं विचित्र वाटतं. पण एका अहवालाने केलेल्या दाव्यानंतर आणखीन विचित्र वाटू शकतं. या अहवालात भविष्यात पृथ्वीवरू पुरुष जमात नामशेष होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. मुलगी किंवा मुलगा जन्माला येणं हे गुणसूत्रांवर अवलंबून असतं. मात्र पुरुषांमधील Y गुणसूत्र हळुहळु लप्त होत असल्याची धक्कादायक माहिती या अहवालात समोर आली आहे.
Y गुणसूत्र झपाट्याने नष्ट होत असल्याचं या संशोधनातून समोर आलं आहे. असं झाल्यास पुढील ४६ लाख वर्षांनंतर पृथ्वीवरून Y गुणसूत्रे पूर्णपणे नष्ट होतील, ज्यामुळे पृथ्वीवरील पुरुषांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. ४६ लाख वर्षे हा खूप मोठा काळ असला तरी पृथ्वीवर अजून ३५० कोटी वर्षांचे जीवन शिल्लक आहे, हेही जाणून घेणे आवश्यक आहे. त्या तुलनेत ४६ लाख वर्षे हा फार कमी काळ आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मानव आणि इतर प्रजातींमध्ये, Y गुणसूत्रानुसार नर किंवा मादी ठरवली जाते. संशोधनानुसार, Y गुणसूत्र मानवांमध्ये हळूहळू नष्ट होत आहे आणि काही दशलक्ष वर्षांत हे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्त्री-पुरुष असंतुलनाची परिस्थिती उद्भवू शकते, त्यामुळे पृथ्वीवर स्त्री-पुरुष संतुलन अबाधित राहावे यासाठी वैज्ञानिक नवीन लैंगिक जनुक विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत. या नवीन जनुकाबद्दल शास्त्रज्ञ खूप उत्साहित आणि आशावादी दिसत आहेत.
मानवजातीमध्ये Y क्रोमोसोम खराब होण्याची किंवा पूर्णपणे नष्ट होण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही अशा अनेक प्रजाती आहेत ज्यांची Y गुणसूत्र लुप्त झाली आहेत. मात्र त्यांच्यात पुन्हा नवीन जनुक विकसीत होत असल्याचं संशोधनात समोर आलं आहे. प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, काटेरी उंदीर प्रजातीतील नर नवी जनुकं विकसित करत असल्याचं समोर आलं आहे.
The Conversation च्या ताज्या अहवालानुसार, असा दावा करण्यात आला आहे की, शास्त्रज्ञ एका संशोधनात या निष्कर्षावर पोहोचले आहेत की पुरुषांमधील Y गुणसूत्र भविष्यात संपुष्टात येऊ शकते. परंतु पुरुष जातीसाठी Y गुणसूत्र आवश्यक आहे आणि या अहवालामुळे चिंतेचा विषय बनला. असे झाले तर जगात मुले जन्माला येणे थांबेल आणि फक्त मुलीच जन्माला येतील, असं म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.