Road Accident Video : किंकाळ्या अन् हाहाकार; भरधाव कारने आंदोलकांना चिरडलं, थरकाप उडवणाारा व्हिडिओ व्हायरल

Road Accident in germany update : जर्मनीत भरधाव कारने आंदोलकांना चिरडल्याची घटना घडली आहे. अपघातानंतरचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला आहे. या अपघातात लहान मुलेही जखमी झाले आहेत.
accident in germany
germanySaam tv
Published On

Road Accident in Germany : जर्मनीच्या म्यूनिख शहरात अपघाताची भीषण घटना घडली आहे. म्यूनिख शहरात भरधाव कारने आंदोलकांना चिरडल्याची घटना घडली आहे. म्यूनिखच्या डाउनटाउन भागात सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास अपघाताची घटना घडली आहे. या अपघातानंतर घटनास्थळी एकच हाहाकार उडाला. पोलिसांनी कार चालकाला तातडीने अटक केली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, जर्मनीच्या म्यूनिख डाउनटाऊन शहरात अपघाताची घटना घडली आहे. एका कार चालकाने रस्त्यावर आंदोलन करणाऱ्यांना चिरडल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर पोलिसांनी मिनी कार जप्त केली आहे. अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, भीषण अपघातात कमीत कमी २८ जण जखमी झाले आहेत. यात काही लहान मुलांचाही समावेश आहे. अपघातातील काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

accident in germany
Viral News: कँडीच्या नावाने मुलांना ड्रग्जचं व्यसन, शाळेतील मुलांना चॉकलेट ड्रग्ज? काय आहे सत्य?

म्यूनिखचे महापौर डायटर रायटर यांनी घटनेविषयी तीव्र शोक व्यक्त केला. अपघातातील जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. सर्व्हिस वर्कर्स यूनियनचे लोक आंदोलन करत होते, त्यावेळी कार चालकाने आंदोलकांना चिरडलं. म्यूनिख पोलिसांनी सांगितलं की, 'डचौअर आणि सीडलच्या रस्त्यावर पोलिसांनी मोठी कारवाई सुरु केली आहे.

accident in germany
Viral News: चोरी करायला गेला, दुकानात घुसला...अचानक घडलं असं काही की...

व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे?

रस्त्यावर काही यूनियनचे आंदोलकाकडून आंदोलन केले जात होते. रस्त्यावर मोठ्या संख्येने आंदोलन सुरु होतं. त्याचवेळी कार चालकाने आंदोलकांना चिरडलं. त्यानंतर रस्त्यावर एकच खळबळ उडाली. कार चालकाने चिरडल्याने अनेक आंदोलक जखमी झाल्याचे दिसत आहे. पोलीस तातडीने मदतीला धावले. एकीकडे पाऊस देखील सुरु आहे.

पावसातच भीषण अपघात झाला आहे. रस्त्यावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. अपघातानंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या डॉक्टरांकडून रस्त्यावरच काही जखमींवर प्राथमिक उपचार सुरु केल्याचं दिसत आहे. तर काही जणांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

accident in germany
Panvel Accident : पनवेलमध्ये एसटी बसला मोठा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटले अन् बस झाडावर आदळली; पाहा थरारक VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com