तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी गुरुवारी आपल्या ताफ्यावर हल्ला झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. भाजपचे झेंडे घेऊन आलेल्या जमावाने आपल्या ताफ्याला लक्ष्य केल्याचा दावा त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे घटनास्थळी पोलिस उपस्थित असतानाही त्यांनी हस्तक्षेप केला नाही, असा आरोपही मोईत्रा यांनी केला आहे. महुआ मोईत्रा यांनी आपल्या मोबाइलमध्ये या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला असून तो ट्विट केला आहे. हा हल्ला अर्ध्या तासापेक्षा जास्त काळ सुरू होता. मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, असे त्यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर जमावातील लोकांनी आपली कार अक्षरशः उचलून दुसरीकडे नेल्याचाही दावा त्यांनी केला आहे.
मोईआ यांनी व्हिडिओमध्ये म्हटले की, आज माझ्यावर हल्ला झाला. ही माझी कार आहे. पोलिसांसमोर जमावाने माझ्यावर हल्ला केला. पोलिस केवळ बघ्याची भूमिका घेत होते. जमावाने माझी कार उचलून दुसरीकडे नेली. भाजपचे झेंडे घेऊन आलेल्या त्याच लोकांनी माझ्यावर हल्ला केला.
तसेच हल्लेखोरांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी आपल्यालाच घटनास्थळावरून हटवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या घटनेवरून महुआ मोईत्रा यांनी सुप्रीम कोर्ट आणि कोलकत्ता हाय कोर्टावर ही टीका केली. कोर्टामधील अवमानाच्या कारवाईचा संदर्भ देत त्यांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्यावर प्रश्न उपस्थित केले.
तुम्ही मला अंडी फेकण्याचा सामना करण्यास सांगितलं होतं. आता पुन्हा पाहा, माझ्या कारवर हल्ला झाला आहे. मी कोर्टाचा अवमान केलेला नाही. कोलकत्ता हायकोर्टाने या घटनांना प्रोत्साहन दिलं आहे. तुम्ही नेमकं काय केलं? असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, सोशल मीडियावर शेअर केलेल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मोठ्या संख्येने जमलेला जमाव महुआ मोईत्रा यांच्या कारचा रस्ता अडवताना आणि त्यांच्या ताफ्यावर अंडी फेकताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.