

Petrol Diesel Price: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत आज कोणताही बदल झालेला नाही. WTI क्रूड प्रति बॅरल 71.78 डॉलरवर व्यापार करत आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 76.61 डॉलरवर विकले जात आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर सुधारित केले जातात. (Latest Marathi News)
महाराष्ट्रातही पेट्रोल २२ पैशांनी तर डिझेल २१ पैशांनी महागले आहे. छत्तीसगडमध्ये पेट्रोल ५० पैशांनी तर डिझेल ४९ पैशांनी महागलं आहे. हरियाणामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २१ पैशांची वाढ झाली आहे. याशिवाय तेलंगणा, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश आणि ओडिशासह अन्य काही राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेल महागले आहे.
त्याच वेळी, पश्चिम बंगालमध्ये पेट्रोलच्या दरात ४४ पैशांनी आणि डिझेलच्या दरात ४१ पैशांनी घट झाली आहे. हिमाचल प्रदेशातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण झाली आहे. महानगरांबद्दल बोलायचे झाले तर चेन्नईत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण झाली आहे.
चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर
– दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर
– मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर
– चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.७३ रुपये आणि डिझेल ९४.३३ रुपये प्रति लिटर
– कोलकाता में पेट्रोल १०६.०३ रुपये और डीजल ९२.७६ रुपये प्रति लीटर
घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर
तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. (Petrol Diesel Price)
BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.