Shishir Shinde resigned: ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेते शिशिर शिंदे यांनी दिला पदाचा राजीनामा

Thackeray group News: पक्षात मनासारखं काम मिळत नसल्याने मी पक्षाचा उपनेतेपदाचा राजीनामा देत असल्याचं शिशीर शिंदे म्हणाले
Shishir Shinde resigned from Deputy leader Of Shivsena (UBT)
Shishir Shinde resigned from Deputy leader Of Shivsena (UBT)SAAM TV
Published On

>> निवृत्ती बाबर, साम टीव्ही

Shishir Shinde resigned from Deputy leader Of Shivsena (UBT): शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपनेते शिशिर शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षात आपल्याला मनासारखं काम मिळत नसल्याची खंत शिशिर शिंदे यांनी व्यक्त केली आहे. आपण राजीनामाचे पत्र उद्धव ठाकरे यांना दिले आहे असे शिशिर शिंदे यांनी सांगितले.

१९ जून २०१८ रोजी शिशिर शिंदे यांची मनसेतून शिवसेनेत घरवापसी झाली होती. त्यानंतर त्यांना ४ वर्ष शिवसेना पक्षात राजकीय पुनर्वसनासाठी वाट पाहावी लागली. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेतेपदी शिशिर शिंदे यांची वर्णी लागली होती. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षात सुरू झालेल्या घडामोडींदरम्यान शिशिर शिंदे यांना उपनेतेपद देण्यात आले होते.

Shishir Shinde resigned from Deputy leader Of Shivsena (UBT)
Thackeray Camp News: उद्या ठाकरे गटाचं राज्यव्यापी शिबीर, उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाचा ठराव येण्याची शक्यता

राजीनामा देताना शिशिर शिंदे यांनी काय लिहिलं?

राजीनामा देताना शिशिर शिंदे यांनी लिहिले की, "दि. १९ जून २०१८ रोजी मी अतिशय आत्मीयतेने शिवसेनेत पक्षप्रवेश केला. त्यानंतर ४ वर्षांत ३० जून २०२२ पर्यंत मला कोणतीही जबाबदारी मिळाली नाही. प्रत्येक कार्यकर्त्यांची काही ओळख असते. कार्यकर्त्याचे काही गुण असतात. परंतु या चार वर्षांच्या कालावधीत माझे कर्तृत्व, संघटन कौशल्य, हातात घेतलेले काम फत्ते करण्याची जबरदस्त जिद्द, समाजाच्या विविध क्षेत्रात असलेले जिव्हाळ्याचे संबंध या सर्व बाबी दुर्लक्षित करण्यात आल्या याची मला खंत वाटते.

माझ्या जीवनातली चार अमूल्य वर्षे फुकट गेली अशी माझी धारणा आहे. ३० जून २०२२ रोजी माझी "शिवसेना उपनेते" म्हणून नियुक्ती अचानकपणे झाली. जबाबदारी नसलेले शोभेचे पद मिळाले. असो. मी आजपासून शिवसेनेच्या उपनेतेपदाचा व पक्षाचा राजीनामा देत आहे. माझ्या कोणत्याही कृत्यामुळे शिवसेनेची बदनामी किंवा अप्रतिष्ठा झाली नाही हे मात्र मी निश्चयपूर्वक अभिमानाने नमूद करतो.

गेल्या सहा महिन्यांत आपली भेट होणे देखील अशक्य झाले. आपण कोणाला नकोसे होणे माझ्या संवेदनशील मनाला मुळीच रुचत नाही. माझी घुसमट मीच थांबवतो. या पत्राद्वारे कोणतेही जाहीर दोषारोप न करता मी आपणास 'जय महाराष्ट्र' करतो." (Breaking News)

Shishir Shinde resigned from Deputy leader Of Shivsena (UBT)
Sangli Crime News: सांगली शहर हादरले! राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची गोळया झाडून हत्या; ८ गोळ्या झाडून हल्लेखोर फरार

बाळासाहेबांचे कट्टर शिलेदार

शिशिर शिंदे हे बाळासाहेबांचे खंदे समर्थक होते, तसेच ते बाळासाहेबांचे कट्टर शिलेदार मानले जात होते. १९९१ मध्ये बाळासाहेबांच्या आदेशानंतर शिशिर शिंदे यांच्या नेतृत्त्वात शिवसैनिकांनी वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी खणली होती. मात्र त्यांनी राज ठाकरेंसोबत शिवसेना सोडली होती. त्यानंतर राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून शिशिर शिंदे यांची ओळख होती. (Latest Political News)

शिशिर शिंदे हे २००९ मध्ये मनसेच्या तिकिटावर विधानसभेवर निवडून गेले होते. अबू आझमी यांनी आमदारकीची हिंदीत शपथ घेतली तेव्हा राडा करणाऱ्या मनसेच्या आमदारांमध्ये शिशिर शिंदे यांचा समावेश होता. त्यानतंर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिशिर शिंदे यांचा पराभव झाला. २०२० मध्ये शिशिर शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेब मला माफ करा, मनसेत जाऊन चूक केली असे म्हणत कान पकडून उठा-बशा काढल्या होत्या. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com